मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर जो देश मी त्यांना दिला आहे त्यातून मी इस्राएली लोकांना छेदून टाकीन आणि हे मंदिर जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. मग इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टा व निंदेचा विषय होतील.

  2. हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन तुच्छतेने म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’

  3. तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह त्यांचे परमेश्वर, ज्यांनी या लोकांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून याहवेहने त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”

  4. शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले.

  5. शलोमोन राजाने ज्या मजुरांना याहवेहचे मंदिर, आपला स्वतःचा राजवाडा, स्तरीय बांधकाम, यरुशलेमचा तट आणि हासोर, मगिद्दो व गेजेर नगर बांधण्यासाठी कामावर लावले होते त्यांचा अहवाल अशाप्रकारे आहे.

  6. याहवेहसाठी बांधलेल्या वेदीवर शलोमोन वर्षातून तीन वेळा होमार्पणे, शांत्यर्पणे करून त्याबरोबर धूप जाळत असे, अशाप्रकारे त्याने मंदिराची कर्तव्ये पूर्ण केली.

  7. जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनची किर्ती व याहवेहशी असलेले त्याचे नाते याविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती आली.

  8. त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्‍यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे झगे, त्याचे प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेले होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली.

  9. याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला इस्राएलच्या राजासनावर ठेवले. इस्राएल प्रीत्यर्थ याहवेहच्या सर्वकाळच्या प्रीतिकरिता न्याय व नीतिमत्व राखून ठेवण्यासाठी त्यांनी तुम्हाला राजा केले आहे.”

  10. शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात कठडे बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. तेव्हापासून आजपर्यंत हे चंदन ना कुठे आणले गेले ना ते कोणाच्या दृष्टीस पडले.)

  11. परमेश्वराने शलोमोनच्या ठायी दिलेले ज्ञान ऐकण्यास जगातील सर्व लोक येत असत.

  12. हे ते राष्ट्र होते ज्याविषयी याहवेहने इस्राएल लोकांना सांगितले होते, “तुम्ही त्यांच्याशी विवाह करू नये, कारण ते खचितच तुमची मने त्यांच्या दैवतांकडे वळवतील.” तरीही, शलोमोन त्या स्त्रियांच्या प्रेमात फार जडला होता.

  13. तो उतार वयाचा होईपर्यंत, त्याच्या पत्नींनी त्याचे हृदय इतर दैवतांकडे वळविले आणि त्याचा पिता दावीदाप्रमाणे शलोमोनचे हृदय आता संपूर्णपणे याहवेह त्याच्या परमेश्वरास समर्पित नव्हते.

  14. याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते शलोमोनने केले; त्याचा पिता दावीदाने केले त्याप्रमाणे शलोमोन याहवेहला पूर्णपणे अनुसरला नाही.

  15. शलोमोनचे हृदय याहवेह इस्राएलचे परमेश्वर, ज्यांनी त्याला दोनदा दर्शन दिले होते त्यांच्यापासून दूर वळले होते, म्हणून याहवेह शलोमोनवर रागावले.

  16. जरी याहवेहने इतर देवांचे अनुसरण करण्यास मना केली होती, तरी शलोमोनने याहवेहची आज्ञा मानली नाही.

  17. म्हणून याहवेहने शलोमोनला म्हटले, “तुझी ही वृत्ती आहे, आणि मी तुला लावून दिलेल्या माझ्या कराराचे व विधींचे पालन तू केले नाही, मी खचितच तुझे राज्य तुझ्यापासून हिसकावून घेईन व ते तुझ्या हाताखालच्या मनुष्याला देईन.

  18. तथापि, तुझा पिता दावीद याच्याप्रीत्यर्थ, ते मी तुझ्या जीवनकाळात करणार नाही. ते मी तुझ्या पुत्राच्या हातून हिसकावून घेईन.

  19. तरीही, संपूर्ण राज्यच मी त्याच्यापासून हिसकावून घेणार नाही, तर माझा सेवक दावीद व यरुशलेम ज्यांना मी निवडले, याच्याप्रीत्यर्थ एक गोत्र मी तुझ्या पुत्राच्या हाती देईन.”

  20. नंतर याहवेहने एदोमी राजघराण्यातील एदोम हदाद याला शलोमोनचा शत्रू म्हणून उभे केले.

  21. परमेश्वराने शलोमोनविरुद्ध आणखी एक शत्रू उभा केला, तो एलयादाचा पुत्र रेजोन होता, जो त्याचा मालक सोबाहचा राजा हादादेजर याच्यापासून पळून गेला होता.

  22. आणि तो यरोबोअमास म्हणाला, “तुझ्यासाठी दहा तुकडे उचलून घे, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘पाहा, मी शलोमोनच्या हातून राज्य हिसकावून घेईन व दहा गोत्र मी तुझ्या हाती देईन.

  23. मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत.

  24. “ ‘परंतु मी शलोमोनच्या हातून आताच संपूर्ण राज्य हिसकावून घेणार नाही; माझा सेवक दावीदाप्रीत्यर्थ मी त्याला त्याच्या जीवनभर अधिकारी असे नेमले आहे, कारण मी दावीदाला निवडले व त्याने माझ्या आज्ञा व विधींचे पालन केले.

  25. मी शलोमोनच्या पुत्राला एक गोत्र देईन, यासाठी की ज्या यरुशलेम नगरास मी माझ्या नावासाठी निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद याचा दीप सदा माझ्यासमोर पेटलेला असेल.