मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण बेथेलमधील वेदी व शोमरोन नगरातील उच्च स्थानावरील मंदिरांविरुद्ध याहवेहच्या वचनानुसार त्याने जे काही जाहीर केले ते निश्चितच घडून येणार.”

  2. परंतु याहवेहने अहीयाहला आधी सांगून ठेवले होते, “यरोबोअमची पत्नी तिच्या मुलाबद्दल तुला विचारण्यास येत आहे, कारण तो आजारी आहे आणि तू तिला असे उत्तर द्यावे. जेव्हा ती आत येईल तेव्हा ती कोणी दुसरीच स्त्री असल्याचे ढोंग करेल.”

  3. जा, यरोबोअमला सांग, याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुला लोकांमधून वर काढले आणि माझ्या इस्राएली लोकांवर त्यांचा अधिकारी असे नेमले.

  4. दावीदाच्या घराण्यापासून राज्य फाडून ते मी तुला दिले, पण तू माझा सेवक दावीदाप्रमाणे नाहीस, त्याने माझ्या आज्ञा पाळल्या व त्याच्या आयुष्यभर त्यांचे अनुसरण केले आणि केवळ जे माझ्या दृष्टीने योग्य ते त्याने केले.

  5. पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुष्कर्मे केली आहेस. तू आपल्यासाठी इतर दैवत घडविलेस, धातूच्या मूर्ती बनविल्यास; तू माझा क्रोध पेटविला आहेस आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.

  6. “ ‘यामुळे यरोबोअमच्या घरावर मी अरिष्ट आणणार आहे. मी इस्राएलातून यरोबोअमच्या घराण्याचा प्रत्येक शेवटचा पुरुष नष्ट करेन; मग तो गुलाम असो वा मोकळा असो. यरोबोअमचे घराणे संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत शेणाप्रमाणे जाळून टाकीन.

  7. यरोबोअमच्या घराण्यातील जे कोणी शहरात मरण पावतील त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खाऊन टाकतील. याहवेहने हे म्हटले आहे!’

  8. सर्व इस्राएली त्याच्यासाठी शोक करून त्याला पुरतील. यरोबोअमच्या घराण्यातील तो एकटाच आहे जो पुरला जाईल, कारण तो एकटाच आहे ज्याच्या ठायी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराला काहीतरी चांगले आढळले आहे.

  9. “याहवेह स्वतःच आपल्यासाठी इस्राएलवर असा राजा उभा करतील जो यरोबोअमच्या कुटुंबाचा उच्छेद करेल. ते आताच घडण्यास सुरुवात होत आहे.

  10. याहवेह इस्राएलवर असा वार करतील की ते वाहत्या पाण्यावरील बोरूप्रमाणे होतील. जी चांगली भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली, त्यातून मी त्यांना उपटून टाकीन व फरात नदीपलीकडे त्यांना पांगून टाकीन, कारण त्यांनी अशेराची खांब तयार करून याहवेहला क्रोधित केले आहे.

  11. यरोबोअमने जी पापे केली व इस्राएलला सुद्धा करण्यास भाग पाडले यामुळे याहवेह त्यांचा त्याग करतील.”

  12. अहीयाह आपला सेवक जो संदेष्टा याच्याद्वारे याहवेहने जे सांगितले त्याप्रमाणे, त्यांनी त्याला पुरले व सर्व इस्राएलने त्याच्यासाठी शोक केला.

  13. त्यावेळी शलोमोनचा पुत्र रेहोबोअम हा यहूदीयाचा राजा होता. तो राजा झाला त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती.

  14. याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते यहूदीयाच्या लोकांनी केले. आणि जी पापे त्यांनी केली त्यामुळे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांपेक्षा त्यांनी याहवेहला अधिक क्रोधित केले.

  15. त्यावेळी देशात मंदिरामध्ये पुरुषगामीही होती; जे सर्व याहवेहने इस्राएलातून काढून टाकले होते, त्या सर्वप्रकारच्या अमंगळ कृत्यांमध्ये लोक भाग घेत होते.

  16. त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले.

  17. जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन उभे राहत असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.

  18. त्याच्या वडिलांनी त्याच्यापूर्वी जी पापे केली होती ती सर्व पापे त्याने केली; त्याचा पूर्वज दावीदाप्रमाणे त्याचे हृदय याहवेह त्याच्या परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित नव्हते.

  19. तरीपण दावीदाप्रित्यर्थ याहवेह त्याचे परमेश्वर यांनी त्याला त्याचा वारस म्हणून यरुशलेमात त्याला दीप दिला व यरुशलेमास बलवान बनविले.

  20. कारण दावीदाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले होते आणि उरीयाह हिथीची घटना वगळता, दावीद आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात याहवेहची कोणतीही आज्ञा पाळण्यापासून मागे वळला नाही.

  21. आसाने आपला पूर्वज दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  22. जरी त्याने पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते.

  23. त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने याहवेहच्या मंदिरात आणले.

  24. त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील भांडारात उरलेले सर्व चांदी व सोने काढून घेतले व ते आपल्या सरदारांच्या हाती स्वाधीन करून त्यांना हेजीओनचा पुत्र ताब्रिम्मनचा पुत्र बेन-हदाद, अरामचा राजा जो दिमिष्कात राज्य करीत होता त्याच्याकडे पाठवले.

  25. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपल्या पित्याचे अनुसरण करीत, त्याच्या पित्याने इस्राएली लोकांना जी पापे करण्यास लावले होते, त्याच मार्गाला तो लागला.