God
God चा उल्लेख असलेली वचने
मग त्याने याहवेहचा धावा करीत म्हटले, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी या विधवेच्या घरात राहत आहे, तिच्या मुलाला मारून आपण तिच्यावर अरिष्ट आणले काय?”
मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि याहवेहकडे आरोळी केली, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, या मुलाचा जीव पुन्हा त्याच्यात येऊ द्यावा!”
याहवेहने एलीयाहची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला आणि तो जिवंत झाला.
तेव्हा ती स्त्री एलीयाहला म्हणाली, “आता मला ठाऊक झाले की आपण परमेश्वराचे मनुष्य आहात आणि आपल्या मुखातील याहवेहचे वचन सत्य आहे.”
काही काळानंतर, म्हणजे तिसऱ्या वर्षी याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: “जा आणि अहाबाच्या समोर हजर हो, आणि मी देशावर पाऊस पाठवेन.”
आणि अहाबाने आपल्या राजवाड्याचा कारभारी ओबद्याहला बोलाविले. (ओबद्याह याहवेहचे फार भय बाळगणारा होता.
जेव्हा ईजबेल याहवेहच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, तेव्हा ओबद्याहने शंभर संदेष्ट्यांना प्रत्येकी पन्नास असे दोन गुहांमध्ये लपविले होते, आणि त्यांना अन्नपाणी पुरविले.)
याहवेह, आपल्या जिवंत परमेश्वराची शपथ, आपला शोध करण्यासाठी माझ्या धन्याने लोक पाठवले नाही असा एकही देश किंवा राज्य नाही. आणि त्या देशात किंवा राज्यात एलीयाह नाही असे कोणी सांगितले, तर एलीयाह त्यांना सापडला नाही असे त्यांना शपथ घेऊन सांगावे लागत असे.
मी तुम्हाला सोडून गेल्यावर याहवेहचा आत्मा तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे मला ठाऊक नाही. पण जर मी जाऊन अहाबाला सांगितले आणि त्याला तुम्ही सापडला नाही, तर तो मला मारून टाकील. मी तर आपला सेवक, माझ्या बालपणापासून याहवेहची उपासना करीत आलो आहे.
ईजबेल राणी प्रभूच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा मी काय केले हे तुम्ही ऐकले नाही काय? एका गुहेत पन्नास असे शंभर याहवेहच्या संदेष्ट्यांना मी दोन गुहांमध्ये लपविले आणि त्यांना अन्नपाणी पुरविले.
एलीयाह म्हणाला, “ज्या सर्वसमर्थ याहवेहची मी सेवा करतो त्या जिवंत परमेश्वराची शपथ, आज मी खचितच अहाबासमोर हजर होईन.”
एलीयाहने उत्तर दिले, “इस्राएलला छळणारा मी नाही, तर तू व तुझ्या पित्याचे घराणे आहे. तुम्ही याहवेहच्या आज्ञा पाळण्याचे सोडून बआलाचे अनुसरण केले आहे.
एलीयाह लोकांच्या समोर जाऊन म्हणाला, “दोन मतांमध्ये तुम्ही कुठवर डगमगत राहणार? जर याहवेह हेच परमेश्वर आहे तर त्यांचे अनुसरण करा; परंतु जर बआल परमेश्वर आहे तर त्याला अनुसरा.” परंतु लोक काही बोलले नाही.
मग एलीयाह त्यांना म्हणाला, “याहवेहचा संदेष्टा म्हणून मी एकटाच उरलो आहे, परंतु बआलाचे तर चारशे पन्नास संदेष्टे आहेत.
मग तुम्ही तुमच्या देवाचा धावा करा, आणि मी माझ्या याहवेहचा धावा करेन. मग जो देव अग्नीद्वारे उत्तर देईल; तोच खरा परमेश्वर.” मग लोक म्हणाले, “तू जे बोलतो ते बरोबर आहे.”
तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली.
“तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले.
त्या धोंड्यांनी त्याने याहवेहच्या नावाने वेदी बांधली आणि वेदीभोवती दोन सिआह बीज मावेल इतकी मोठी खळगी खणली.
यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत.
मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.”
तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले.
जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!”
याहवेहचे सामर्थ्य एलीयाहवर आले आणि तो आपली कंबर बांधून अहाबापुढे येज्रीलपर्यंत धावत गेला.
तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.”
याहवेहचा दूत परत दुसर्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.”