मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर एलीयाह तिश्बीकडे याहवेहचे वचन आले:

  2. “अहाब माझ्यासमोर कसा नम्र झाला आहे हे तुला दिसते का? कारण त्याने स्वतःला नम्र केले आहे, म्हणून हे अरिष्ट मी तो जिवंत असताना आणणार नाही, परंतु ते मी त्याच्या घराण्यावर त्याच्या पुत्राच्या काळात आणेन.”

  3. परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.”

  4. तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?” ते म्हणाले, “जा, कारण प्रभू ते राजाच्या हाती देतील.”

  5. परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?”

  6. इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.” यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.”

  7. तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ”

  8. इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो, कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.”

  9. पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”

  10. तो जेव्हा आला, तेव्हा राजाने त्याला विचारले, “मिखायाह, आम्ही रामोथ गिलआदविरुद्ध युद्धास जावे किंवा नाही?” त्याने उत्तर दिले, “हल्ला करून विजयी व्हा, कारण याहवेह ते राजाच्या हाती देईल.”

  11. राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?”

  12. तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ”

  13. मिखायाह पुढे म्हणाला, “तर आता याहवेहचे वचन ऐका: याहवेह आपल्या सिंहासनावर बसलेले आणि स्वर्गातील सर्व समुदाय त्यांच्या सभोवती डावीकडे व उजवीकडे उभा असलेला मला दिसला.

  14. आणि याहवेहने म्हटले, ‘अहाबाने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’ “तेव्हा एकाने एक तर दुसर्‍याने दुसरी मसलत दिली.

  15. तेव्हा एक आत्मा पुढे आला आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोहात पाडेन.’

  16. “याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’ “तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा होईन.’ “याहवेहने म्हटले, ‘तू त्याला मोहात पाडण्यास यशस्वी होशील. जा आणि तसे कर.’

  17. “तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.”

  18. तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह उठला व मिखायाहच्या गालावर चापट मारत विचारले, “याहवेहचा आत्मा माझ्यामधून निघून तुझ्याशी बोलायला कोणत्या मार्गाने गेला?”

  19. तेव्हा मिखायाह म्हणाला, “तू जर सुखरुप परत आलास तर याहवेह माझ्याद्वारे बोललेच नाही असे समजावे.” तो पुढे म्हणाला, “लोकांनो, तुम्ही सर्वजण हे लक्षात ठेवा!”

  20. शोमरोनाच्या तळ्याकडे (जिथे वेश्या आंघोळ करीत असत), आणि याहवेहच्या वचनानुसार कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले.

  21. त्याने आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नव्हती आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.

  22. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याने ज्यांनी इस्राएलास पाप करावयाला भाग पाडले असा आपला पिता, आई व नेबाटाचा पुत्र यरोबोअम त्यांचे अनुसरण केले.

  23. त्याने बआलची सेवा व उपासना केली आणि आपल्या पित्याप्रमाणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.

  24. परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राजाच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’

  25. म्हणून याहवेह हे म्हणतात की: ‘ज्या अंथरुणावर तू पडला आहेस, त्यावरून तू उठणार नाही. तू खात्रीने मरशील!’ ” मग एलीयाह निघून गेला.