मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु आता एका वीणावादकाला मजकडे घेऊन या.” हा वादक वीणा वाजवित असताना याहवेहचा हात अलीशावर आला

  2. आणि तो म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: मी या दरीला पाण्याच्या तळ्यांनी भरून टाकीन.

  3. कारण याहवेह असे म्हणतात: तुम्हाला वारा किंवा पाऊस दिसणार नाही, तरीही ही दरी पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही, तुमचे गुरे आणि इतर जनावरे ते पाणी पितील.

  4. हे तर याहवेहच्या दृष्टीने फार सोपे आहे, ते मोआबी लोकांना देखील तुमच्या हातात देतील.

  5. संदेष्ट्यांच्या समुहातील एका मनुष्याची पत्नी रडून अलीशाला म्हणाली, “तुमचा सेवक माझा पती मरण पावला आहे आणि तुम्हाला माहीत आहे तो याहवेहचे भय बाळगणारा होता. पण आता त्याचा सावकार माझ्या दोन मुलांना त्याचे गुलाम व्हावे म्हणून घ्यायला येत आहे.”

  6. ती परमेश्वराच्या माणसाजवळ गेली आणि त्याला सांगितले, तो म्हणाला, “आता जा आणि तेल विकून आपले कर्ज फेड. जे शिल्लक राहिलेले आहे त्यावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह कर.”

  7. ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे.

  8. अलीशा तिला म्हणाला, “पुढील वर्षी यावेळेस तू आपल्या पुत्रास उराशी धरशील.” ती म्हणाली, “माझ्या स्वामी, नाही, परमेश्वराच्या मनुष्या, कृपया तुम्ही मला अशी खोटी अाशा देऊ नका!”

  9. ती त्याला घेऊन वर गेली आणि परमेश्वराच्या माणसाच्या खाटेवर ठेवले आणि दार बंद करून ती बाहेर गेली.

  10. तिने आपल्या पतीला हाक मारली आणि म्हटले, “एक सेवक व एक गाढव माझ्याकडे पाठवून द्या, कारण मला ताबडतोब परमेश्वराच्या मनुष्याकडे त्याची भेट घेऊन परत येते.”

  11. ती निघाली आणि कर्मेल डोंगराजवळ परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. जेव्हा त्याने तिला दुरून पहिले, तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “बघ, ती शूनेमकरीण!

  12. जेव्हा ती परमेश्वराच्या मनुष्याच्या डोंगरावर पोहोचली, तेव्हा तिने त्याचे पाय धरले. जेव्हा गेहजी तिला दूर लोटू लागला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला सोड! ती फार दुःखात आहे, पण याहवेहने त्याचे कारण मला कळविले नाही आणि ते माझ्यापासून गुप्त ठेवले.”

  13. परंतु मुलाची आई म्हणाली, “याहवेहची आणि तुमच्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही.” म्हणून तो उठला आणि तिच्यामागून निघाला.

  14. तेव्हा अलीशा आत गेला, त्याने दोघांच्या मागे दार बंद करून घेतले, आणि याहवेहची प्रार्थना केली.

  15. शाकभाजी माणसांना वाढण्यात आली, पण जसे त्यांनी खाण्यास सुरुवात केली, ते खाताच ओरडू लागले, “परमेश्वराच्या मनुष्या, या भांड्यामध्ये मृत्यू आहे!” आणि ते भोजन करू शकले नाही.

  16. एके दिवशी बआल-शालीशाह येथून एका मनुष्याने आपल्या प्रथम पिकातील काही धान्य आणि जवाच्या वीस भाकरी एका पिशवीत घालून परमेश्वराच्या मनुष्याकडे आणल्या. तेव्हा तो म्हणाला, “लोकांना खाण्यास दे.”

  17. त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?” परंतु अलीशाने उत्तर दिले, “हे लोकांना खाण्यास दे. कारण याहवेह असे म्हणतात: ‘ते खातील आणि काही शिल्लक राहील.’ ”

  18. मग त्याने ते त्यांच्यासमोर वाढले, आणि त्यांनी ते खाल्ले आणि याहवेहच्या वचनानुसार काही शिल्लक देखील उरले.

  19. नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग झाला होता.

  20. एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”

  21. इस्राएलाच्या राजाने ते पत्र वाचले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली व म्हणाला, “मी परमेश्वर आहे काय? मी कोणाला मारून त्याला पुन्हा जिवंत करू शकतो काय? या व्यक्तीने कोणाला तरी माझ्याकडे कुष्ठरोग बरा होण्यासाठी का पाठविले आहे? पाहा तो कसा माझ्यासोबत भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधीत आहे!”

  22. इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.”

  23. परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील.

  24. मग तो खाली गेला आणि परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे यार्देन नदीमध्ये सात वेळा बुड्या मारल्या आणि त्याचे शरीर पूर्ववत् होऊन लहान मुलाच्या शरीरासारखे शुद्ध झाले.

  25. नंतर नामान आणि त्याचे सर्व लोक परमेश्वराच्या मनुष्याकडे परत गेले. तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “शेवटी इस्राएलशिवाय जगामध्ये इतरत्र कुठेही परमेश्वर नाही, हे मला आता पूर्णपणे समजून चुकले आहे. तुमच्या सेवकाद्वारे आणलेल्या नजराण्यांचा कृपया स्वीकार करा.”