मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या पापाची क्षमा करा आणि मी याहवेहची उपासना करावी म्हणून परत माझ्याबरोबर या.”

  2. परंतु शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही. तू याहवेहच्या वचनाचा धिक्कार केला आहे आणि याहवेहनेही तुला इस्राएलचा राजा म्हणून धिक्कारले आहे.”

  3. तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने आज इस्राएलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन ते तुझ्यापेक्षा उत्तम असलेल्या तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे.

  4. शौलाने उत्तर दिले, “मी पाप केले आहे, तरीही माझ्या लोकांच्या वडीलजनांसमोर व इस्राएलसमोर माझा मान राखा; माझ्याबरोबर परत या, म्हणजे मी याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना करेन.”

  5. तेव्हा शमुवेल शौलाबरोबर परत गेले आणि शौलाने याहवेहची उपासना केली.

  6. परंतु शमुवेलने म्हटले, “जसे तुझ्या तलवारीने अनेक स्त्रियांना अपत्यहीन केले, तसेच तुझी आई स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” आणि शमुवेलने याहवेहसमोर गिलगालात अगागाला मारून टाकले.

  7. शमुवेल आपल्या मरण्याच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला गेला नाही, परंतु शमुवेलने त्याच्यासाठी शोक केला. आणि आपण शौलाला इस्राएलवर राजा केले म्हणून याहवेहला पश्चाताप झाला.

  8. याहवेह शमुवेलला म्हणाले, “मी शौलाला इस्राएलाचा राजा म्हणून नाकारले आहे, तर तू कुठवर त्याच्यासाठी शोक करीत राहणार? तुझे शिंग तेलाने भर आणि चल; मी तुला बेथलेहेमकर इशाय याच्याकडे पाठवित आहे. मी त्याच्या एका पुत्राला राजा म्हणून निवडले आहे.”

  9. परंतु शमुवेल म्हणाला, “मी कसे जाऊ? जर शौलाने याविषयी ऐकले, तर तो मला जिवे मारेल.” याहवेह म्हणाले, “तुझ्यासोबत एक कालवड घे आणि सांग, ‘मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे.’

  10. इशायला यज्ञासाठी आमंत्रित कर आणि तू काय करावे ते मी तुला दाखवेन. ज्याला मी सूचित करेन त्याला तू माझ्यासाठी अभिषिक्त कर.”

  11. याहवेहने सांगितल्याप्रमाणे शमुवेलने केले. जेव्हा शमुवेल बेथलेहेमला पोहोचला, तेव्हा त्या नगराचे वडीलजन थरथर कापत त्याला भेटले. त्यांनी विचारले, “आपण शांतीने आला आहात काय?”

  12. शमुवेलने उत्तर दिले, “होय, मी शांतीने आलो आहे; मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे. आपणास शुद्ध करा आणि माझ्याबरोबर यज्ञाला या.” मग शमुवेलने इशाय व त्याच्या पुत्रांना शुद्ध केले आणि त्यांना यज्ञासाठी आमंत्रण दिले.

  13. ते आल्यानंतर एलियाबाला पाहून शमुवेलला वाटले, “निश्चितच याहवेहचा अभिषिक्त येथे याहवेहसमोर उभा आहे.”

  14. परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, “त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात.”

  15. नंतर इशायाने अबीनादाबाला शमुवेलसमोर चालविले. परंतु शमुवेलने म्हटले, “याहवेहने यालाही निवडले नाही.”

  16. नंतर इशायाने शम्माहला चालविले, परंतु शमुवेल म्हणाला, “हा सुद्धा याहवेहने निवडलेला नाही.”

  17. इशायाने त्याचे सात पुत्र शमुवेलसमोर चालविले, परंतु शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने यांना निवडले नाही.”

  18. तेव्हा इशायाने त्याला बोलावून आणले. तो तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला देखणा होता. तेव्हा याहवेह म्हणाले, “ऊठ आणि त्याला अभिषिक्त कर, हाच तो आहे.”

  19. तेव्हा शमुवेलने तेलाचे शिंग घेतले व त्याच्या भावांदेखत दावीदाचा अभिषेक केला आणि त्या दिवसापासून याहवेहचा आत्मा सामर्थ्याने दावीदावर आला. नंतर शमुवेल रामाह येथे परत गेला.

  20. आता याहवेहचा आत्मा शौलापासून निघून गेला होता आणि याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा त्याला बाधा करू लागला.

  21. शौलाच्या सेवकांनी त्याला म्हटले, “पाहा, परमेश्वराकडून पाठविलेला हा दुष्ट आत्मा तुम्हाला बाधा करीत आहे.

  22. आमच्या धन्याने त्याच्या या सेवकांना आज्ञा द्यावी की एक उत्कृष्ट वीणावादकाचा शोध करावा, म्हणजे जेव्हा परमेश्वराकडून येणारा दुष्ट आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तो वीणा वाजवेल, आणि तुम्हाला बरे वाटेल.”

  23. त्यापैकी एका सेवकाने उत्तर दिले, “मी बेथलेहेमकर इशायाचा पुत्र पाहिला आहे, तो वीणा वादनात निपुण आहे. तो शूर व योद्धा आहे, तो उत्तम वक्ता व रूपवान आहे; व याहवेह त्याच्याबरोबर आहेत.”

  24. ज्या ज्यावेळी परमेश्वराकडून पाठविलेला दुष्ट आत्मा शौलावर येई, त्यावेळी दावीद आपली वीणा घेऊन वाजवित असे, तेव्हा शौलाला बरे वाटत असे, आणि दुष्ट आत्मा शौलाला सोडून जात असे.

  25. दावीदाने त्याच्या बाजूला उभे असलेल्या पुरुषांना विचारले, “जो या पलिष्टी मनुष्याला मारेल आणि इस्राएलची ही अप्रतिष्ठा काढून टाकेल, त्याला काय करण्यात येईल? हा बेसुंती पलिष्टी मनुष्य कोण आहे की त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला चेतावणी द्यावी?”