God
God चा उल्लेख असलेली वचने
अशाप्रकारे त्या दिवशी याहवेहने इस्राएलची सुटका केली आणि युद्ध बेथ-आवेनच्या पलीकडे गेले.
मग कोणी शौलाला सांगितले, “पाहा, रक्तासहित मांस खाऊन लोक याहवेहविरुद्ध पाप करीत आहेत.” “तुम्ही विश्वासघात केला आहे,” तो म्हणाला, “एक मोठा दगड इकडे लवकर लोटत आणा.”
तेव्हा शौल म्हणाला, “लोकांमध्ये जा आणि त्यांना सांग, ‘तुमच्यातील प्रत्येकाने तुमचे गुरे व मेंढरे माझ्याकडे आणा आणि त्यांना या ठिकाणी कापून खा. रक्तासहित मांस खाऊन याहवेहविरुद्ध पाप करू नका.’ ” तेव्हा सर्वांनी आपआपले बैल आणून त्या रात्री तिथे ते कापले.
नंतर शौलाने याहवेहसाठी एक वेदी बांधली. शौलाने बांधलेली ही पहिलीच वेदी होती.
शौल म्हणाला, “चला, आपण रात्री खाली जाऊन पलिष्ट्यांचा पहाटेपर्यंत पाठलाग करू आणि त्यांच्यातील एकालाही जिवंत सोडू नये.” लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.” परंतु याजकाने म्हटले, “याबाबत आपण परमेश्वराला विचारू.”
तेव्हा शौलाने परमेश्वराला विचारले, “मी खाली जाऊन पलिष्ट्यांचा पाठलाग करावा काय? त्यांना तुम्ही इस्राएलच्या हाती देणार काय?” परंतु परमेश्वराने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही.
इस्राएलचा उद्धार करणारा याहवेह यांची शपथ, पापाचा दोष जरी माझा पुत्र योनाथान याच्यावर असला, तरी त्याने मरावे.” परंतु कोणीही काही बोलले नाही.
शौलाने याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, “तुम्ही आपल्या सेवकाला आज उत्तर का दिले नाही? जर मी किंवा माझा पुत्र योनाथान दोषी आहे तर उरीमद्वारे ते दाखवावे, परंतु जर इस्राएलचे लोक दोषी आहेत, तर थुम्मीमद्वारे ते दाखवावे.” योनाथान व शौलाची चिठ्ठी निघाली आणि लोक त्यातून सुटले.
शौल म्हणाला, “योनाथान, जर मी तुला मृत्युदंड दिला नाही, तर परमेश्वर माझ्याशी कठोरपणे वागो.”
परंतु सैनिकांनी शौलाला म्हटले, “ज्याने इस्राएली लोकांस हा मोठा उद्धार आणला आहे, तो योनाथान मरावा काय? कदापि नाही! जिवंत याहवेहची शपथ, त्याच्या डोक्यावरील एक केसही खाली पडणार नाही, कारण त्याने आज जे केले ते परमेश्वराच्या साहाय्याने केले आहे.” याप्रकारे लोकांनी योनाथानला सोडविले आणि त्याला मृत्युदंड दिला नाही.
शमुवेल शौलास म्हणाला, “इस्राएल लोकांवर राजा म्हणून तुझा अभिषेक करण्यास याहवेहने मलाच पाठवले होते; तर आता याहवेहचा संदेश ऐक.
सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी अमालेकी लोकांनी त्यांना रस्त्यात कसे अडविले, त्यासाठी मी त्यांना शिक्षा करणार.
तेव्हा याहवेहचे वचन शमुवेलकडे आले:
“मी शौलास राजा केले याबद्दल मला पश्चाताप होत आहे, कारण तो माझ्यापासून फिरला आहे आणि त्याने माझ्या आज्ञांचे पालन केले नाही.” शमुवेल फार संतापला आणि रात्रभर याहवेहकडे रडला.
जेव्हा शमुवेलने शौलाला गाठले, शौल म्हणाला, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो! मी याहवेहच्या सूचना पार पाडल्या आहेत.”
शौलाने उत्तर दिले, “सैन्याच्या लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे याहवेह तुमचा परमेश्वर यांच्या यज्ञासाठी राखून ठेवले आहेत, परंतु बाकीच्या सर्वांचा आम्ही पूर्णपणे नाश केला आहे.”
तेव्हा शमुवेल शौलास म्हणाले, “पुरे! काल रात्री याहवेहने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो.” “सांगा,” शौल म्हणाला.
शमुवेल म्हणाले, “एकेकाळी तू आपल्याच दृष्टीने लहान होतास, तरी इस्राएलच्या गोत्रांचा पुढारी तू झाला नाहीस काय? याहवेहने तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
आणि याहवेहने तुला एका कामगिरीवर पाठवित म्हटले, ‘जा आणि त्या दुष्ट अमालेक्यांचा पूर्णपणे नाश कर, ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याविरुद्ध युद्ध कर.’
तू याहवेहच्या आज्ञेचे पालन का केले नाहीस? लुटीवर झडप घालून तू याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?”
शौल शमुवेलला म्हणाला, “पण मी याहवेहचे आज्ञापालन केले, याहवेहने मला दिलेल्या कामगिरीवर मी गेलो, अमालेक्यांचा मी पूर्णपणे नाश केला आणि अगाग त्यांचा राजा याला मी घेऊन आलो.
सैनिकांनी त्या लुटीतील मेंढरे व गुरे घेतली व त्यातील जे उत्तम ते गिलगालात याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यासाठी यज्ञ करावे म्हणून राखून ठेवली आहेत.”
परंतु शमुवेलने उत्तर दिले: “त्यांच्या आज्ञा पाळल्याने याहवेहला जितका होतो तितका आनंद होमार्पणे व यज्ञांनी होईल काय? यज्ञापेक्षा आज्ञापालन चांगले, आणि एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.
कारण बंडखोरी ही शकुनविद्येच्या पापासारखी आहे, आणि हट्टीपणा मूर्तिपूजेसारखा वाईट आहे. तू याहवेहचे वचन धिक्कारले यामुळे, त्यांनी तुला राजा म्हणून धिक्कारले आहे.”
शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले.