मुख्य मजकुरावर जा

Aaron

331 वचने · 9 कुटुंब सदस्य

Aaron चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.

  2. मग मोशेचा सासरा इथ्रोने परमेश्वरासाठी होमार्पण व इतर अर्पणे आणली आणि अहरोन व इस्राएली लोकांचे सर्व वडील मोशेच्या सासर्‍याबरोबर भोजन करावयास परमेश्वराच्या समक्षतेत आले.

  3. याहवेहने उत्तर दिले, “खाली जा आणि अहरोनाला तुझ्याबरोबर घेऊन ये. परंतु याजकांनी व लोकांनी याहवेहकडे सीमा ओलांडून येऊ नये, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”

  4. मग याहवेहने मोशेला म्हटले, “तू आणि अहरोन, नादाब आणि अबीहू व इस्राएलींचे सत्तर वडील याहवेहकडे वर या. तुम्ही दुरूनच उपासना करावी,

  5. मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले.

  6. तो वडीलजनांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत येथेच थांबा, जर कोणाचा काही वाद असला तर त्यांनी अहरोन आणि हूर तुमच्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे जावे.”

  7. सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”

  8. “तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे.

  9. अहरोन तुझा भाऊ याला सन्मान आणि गौरव मिळावा म्हणून त्याच्यासाठी पवित्र वस्त्रे तयार करावी.

  10. ज्यांना अशा बाबतीत मी ज्ञान दिले आहे, त्या सर्व कुशल कारागिरांना सांग की अहरोनाच्या पवित्रीकरणासाठी त्यांनी वस्त्रे बनवावी, यासाठी की त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी.

  11. त्यांनी जी वस्त्रे बनवावी ती ही: ऊरपट, एफोद, एक झगा, भरतकाम केलेला अंगरखा, फेटा व कमरबंद. त्यांनी ही पवित्र वस्त्रे तुझा भाऊ अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी बनवावी, यासाठी की याजक म्हणून त्यांनी माझी सेवा करावी.

  12. आणि ते एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून रत्ने लावावी. याहवेहसमोर स्मारक म्हणून अहरोनाने ही नावे आपल्या खांद्यांवर वागवावी.

  13. “अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल.

  14. जेव्हा तो याहवेहच्या उपस्थितीत जाईल, तेव्हा अहरोनाने उरीम व थुम्मीम सुद्धा ऊरपटात, आपल्या हृदयावर ठेवून जावे. अशाप्रकारे अहरोनाने नित्यनेमाने इस्राएली लोकांसाठी निर्णय घेणार्‍या वस्तू आपल्या हृदयावर वाहत याहवेहसमोर यावे.”

  15. अहरोनाने तो झगा सेवा करीत असताना घालावा. जेव्हा तो याहवेहसमोर पवित्रस्थानात जातो व बाहेर येतो त्यावेळी घंट्यांचा आवाज ऐकू येईल, म्हणजे तो मरणार नाही.

  16. ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.”

  17. अहरोनाच्या पुत्रांचा मान व आदर राखला जावा, म्हणून त्यांच्यासाठी झगे, कमरबंद व टोप्या बनवाव्या.

  18. तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांच्या अंगावर ही वस्त्रे घातल्यावर, त्यांचा अभिषेक आणि समर्पण कर. त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र कर.

  19. अहरोन व त्याचे पुत्र ज्यावेळी सभामंडपात येतील किंवा सेवेसाठी वेदीकडे पवित्रस्थानात जातील, त्यावेळी त्यांनी ती वस्त्रे घालावी, म्हणजे ते दोषी ठरून मरणार नाहीत. “अहरोन व त्याच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा.”

  20. मग अहरोन व त्याच्या पुत्रांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणून त्यांना पाण्याने धुवावे;

  21. वस्त्रे घ्या आणि अहरोनास अंगरखा व त्याबरोबर एफोदाचा झगा, एफोद, ऊरपट हे परिधान करावे. त्यावर कुशलतेने विणलेल्या कमरपट्ट्याने एफोद बांधावा;

  22. त्यांना फेटे बांधावे. मग अहरोनास व त्याच्या पुत्रांना कमरपट्टे बांधावे. याप्रमाणे याजकत्व कायमचे त्यांचेच असणार. “मग तू अहरोन व त्याच्या मुलांना अभिषेक करावा.

  23. “मग सभामंडपाच्या समोर गोर्‍हा आणावा व त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याच्या पुत्रांनी आपले हात ठेवावेत.

  24. “मग त्यातील एक मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे.

  25. “मग दुसरा मेंढा घ्यावा व अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत.