- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
देशवाटपासाठी नेते नेमले जातात
गणना ३४:१६-२९
देशवाटपासाठी नेते नेमले जातात
१६
याहवेह मोशेला म्हणाले,
१७
“ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ.
१८
आणि देश वाटणीच्या मदतीसाठी प्रत्येक गोत्रातून एक पुढारी नेमावा.
१९
“ही त्यांची नावे आहेत: “यहूदाहच्या गोत्रातून, यफुन्नेहचा पुत्र कालेब;
२०
शिमओनच्या गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र शमुवेल;
२१
बिन्यामीनच्या गोत्रातून, किसलोनचा पुत्र एलीदाद;
२२
दानच्या गोत्रातून, योगलीचा पुत्र बुक्की हा पुढारी होता.
२३
योसेफाचा पुत्र मनश्शेह याच्या गोत्रातून, एफोदचा पुत्र हन्नीऐल हा पुढारी होता.
२४
योसेफाचा पुत्र एफ्राईम याच्या गोत्रातून, शिफतनचा पुत्र कमुवेल हा पुढारी होता.
२५
जबुलूनच्या गोत्रातून, परनाखचा पुत्र एलीजाफान हा पुढारी होता.
२६
इस्साखारच्या गोत्रातून, अज्जानचा पुत्र पलतीएल हा पुढारी होता.
२७
आशेरच्या गोत्रातून, शलोमीचा पुत्र अहिहूद हा पुढारी होता.
२८
नफताली गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र पेदेहेल हा पुढारी होता.”
२९
इस्राएली लोकांना कनान देशात वतन वाटून देण्यासाठी याहवेहने ज्या पुरुषांना आज्ञा दिली ते हे आहेत.
उताऱ्याचा अभ्यास
एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
यहोशुआ १४:१
एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या गोत्राच्या कुलप्रमुखांनी इस्राएली लोकांना कनान देशातील हे भाग वतन म्हणून दिले.वचन १७ मधूनगणना २६:६५
कारण याहवेहने त्या इस्राएली लोकांना सांगितले होते की ते खचितच रानात मरतील आणि यफुन्नेहचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुआ यांच्याशिवाय एकही उरले नाही.वचन १९ मधूनयहोशुआ १९:५१
या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले.वचन १७ मधूनगणना १:४
प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी.वचन १८ मधूनगणना १:१६
हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.वचन १८ मधूनगणना १३:३०
तेव्हा मोशेसमोर कालेबाने लोकांना शांत केले व म्हणाला, “आपण वर जाऊन तो देश ताब्यात घेतला पाहिजे, कारण आपण खचितच ते करू शकतो.”वचन १९ मधूनगणना १३:८
एफ्राईमच्या गोत्रातील नूनाचा पुत्र होशा;वचन १७ मधूनगणना १३:१६
देश हेरावयाला जे पुरुष मोशेने पाठवले त्यांची ही नावे होती. (मोशेने नूनाचा पुत्र होशाचे नाव बदलून त्याला यहोशुआ हे नाव दिले.)वचन १७ मधूनअनुवाद ३३:७
आणि तो यहूदाहबद्दल असे म्हणाला: “हे याहवेह, यहूदाहचा धावा ऐका; आणि त्याला आपल्या लोकांजवळ आणा. स्वतःच्या हाताने ते त्याचे संरक्षण करतात, तुम्हीच त्याच्यासाठी त्याच्या शत्रूविरुद्ध साहाय्य व्हा!”वचन १९ मधूनउत्पत्ती २९:३५
ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक पुत्र झाला तिने त्याचे नाव यहूदाह असे ठेवले, कारण ती म्हणाली, “आता मी याहवेहची स्तुती करेन.” यानंतर तिला मूल होण्याचे थांबले.वचन १९ मधूनगणना १४:६
नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब, जे त्यापैकीच देश हेरून आले होते तेही होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडलीवचन १९ मधूनगणना १४:२४
परंतु माझा सेवक कालेब याच्यावर वेगळा आत्मा आहे आणि तो संपूर्ण हृदयाने माझे अनुसरण करतो, म्हणून तो ज्या देशात गेला होता तिथे मी त्याला नेईन व त्याचे वंशज त्या देशाचे वतन पावतील.वचन १९ मधून

अभ्यास टीप
Settings