Skip to content

Time बद्दल बायबलमधील वचने

82 वचने · 44 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या तिसाव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, खेबर नदीजवळ मी निर्वासित लोकांबरोबर असताना, स्वर्ग उघडले आणि मी परमेश्वराचा दृष्टान्त पाहिला.

  2. बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, एक मनुष्य जो यरुशलेमहून निसटून आला होता, तो माझ्याकडे येऊन म्हणाला, “शहर पडले आहे!”

  3. आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, वर्षाच्या सुरुवातीला, महिन्याच्या दहाव्या दिवशी, शहराचे पतन झाल्यानंतर चौदाव्या वर्षी; त्याच दिवशी याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला तिथे नेले.

  4. एकाएकी मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि राजवाड्यातील दिवठणीच्या समोरच्या भिंतीच्या गिलाव्यावर काहीतरी लिहू लागली. ती हाताची बोटे लिहित असतानाच राजाने ती पाहिली.

  5. तो परमोच्च परमेश्वराच्या विरुद्ध बोलेल आणि त्यांच्या पवित्र लोकांवर अत्याचार करेल आणि निर्धारित वेळ आणि कायदे बदलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र लोक एक वेळ, दोन वेळा आणि अर्धा वेळ त्याच्या हातात देण्यात येतील.

  6. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.

  7. त्यावेळेस मी, दानीएल, तीन आठवडे शोक करीत होतो.

  8. तागाची वस्त्रे नेसलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाने आपला उजवा हात आणि त्याचा डावा हात स्वर्गाकडे उंचाविला व जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची शपथ देऊन सांगितले, “एक समय, दोन समय आणि अर्धा समय. शेवटी जेव्हा पवित्र लोकांच्या शक्तीचा नाश होईल तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”

  9. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले.

  10. ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!”

  11. तिथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले,

  12. तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी—ज्यावेळी पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, हेरोद गालील प्रांताचा, त्याचा भाऊ फिलिप्प इतुरीया व त्राखोनीतीचा आणि लूसनिया अबिलेनेचा शासक होता.

  13. नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली.

  14. खडकाळ जमिनीसारखे असलेले ते हे, जे वचन आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते किंचितकाळ विश्वास ठेवतात, परंतु परीक्षा आली म्हणजे ते पडतात.

  15. आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या.

  16. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो, तसेच माझ्या मिळकतीचा दशांश देतो.’

  17. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते.

  18. यास्तव पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जावी व दिवसेंदिवस प्रभूकडून तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त व्हावी,

  19. तरी ज्याविषयी फार पूर्वीपासून परमेश्वराने आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते की सर्व गोष्टींची पुनर्स्थापना होईपर्यंत, त्यांना स्वर्गामध्ये राहणे अगत्याचे आहे.

  20. त्यांनी एका मनुष्यापासून सर्व राष्ट्रे उत्पन्न केली, त्यांनी सर्व पृथ्वीवर निवास करावा असे केले आणि इतिहासामध्ये त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या निवासांच्या निश्चित सीमा त्यांनी आधी नेमल्या होत्या.

  21. हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ.

  22. कारण ते म्हणतात, “माझ्या कृपेच्या समयी तुमची विनवणी माझ्या कानी आली. तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य केले.” मी तुम्हाला सांगतो, आताच परमेश्वराच्या कृपेचा समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे.

  23. परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते.

  24. ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या.

  25. दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.