Skip to content

Time बद्दल बायबलमधील वचने

82 वचने · 44 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.

  2. तेव्हा आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्यावेळी साहाय्य मिळण्यासाठी आपल्याला कृपा प्राप्त व्हावी, म्हणून आपण धैर्याने प्रत्यक्ष परमेश्वराच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ या.

  3. हे विधी केवळ अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या शुद्ध करण्याच्या विधी याबाबत आहेत—बाह्य नियम नवा काळ येईपर्यंत लावून दिले आहेत.

  4. तुम्ही ज्यांना पिता म्हणून हाक मारता, ते प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा निःपक्षपातीपणाने न्याय करतात, म्हणून या जगात तुमचे जीवन परदेशीयांसारखे आदरयुक्त भीतीने व्यतीत करा.

  5. प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका: प्रभूसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.

  6. आणि जे युगानुयुग जिवंत आहे, ज्यांनी आकाश व त्यातील सर्वकाही, पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही, समुद्र व त्यातील सर्व जलचर निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले, “आता अधिक विलंब लागणार नाही!

  7. पण तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या जागी तिने उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाच्या पंखांसारखे दोन पंख देण्यात आले. तिथे तिचे साडेतीन वर्षे पोषण व त्या अजगरापासून रक्षण व्हावयाचे होते.