मुख्य मजकुरावर जा

The Power of God बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात; लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.

  2. दुष्टांचे सामर्थ्य मोडून टाकले जाईल, परंतु याहवेह नीतिमानांना आधार देतात.

  3. परमेश्वर एकदा बोलले आहेत, मी दोनदा हे ऐकले आहे: “सामर्थ्य याहवेहचेच आहे,

  4. यहूदीयाच्या रानात असताना रचलेले दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात, मी तुमचा कळकळीने शोध करतो; या कोरड्या आणि वैराण भूमीत माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे; माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती उत्कंठित झाले आहे.

  5. तुमचे सामर्थ्य आणि गौरव मी तुमच्या पवित्रस्थानी पाहिले आहे.

  6. आपल्या महान शक्तीने त्यांनी पर्वतांना त्यांच्या ठिकाणी स्थिर ठेवले आहे.

  7. आपल्या सामर्थ्याने ते सदासर्वकाळ राज्य करतात, प्रत्येक राष्ट्रांना ते न्याहाळून पाहतात— की बंडखोरांनी त्यांच्याविरुद्ध विद्रोह करू नये. सेला

  8. अनादि काळापासून अत्युच्च आकाशात स्वारी करतात, ज्यांचा प्रचंड आवाज ढगांच्या गर्जनांसारखा आहे.

  9. परमेश्वरा, तुम्ही आपल्या पवित्रस्थानात भयावह आहात; इस्राएलचे परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य आणि बळ देतात. परमेश्वर धन्यवादित असो!

  10. बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका; मरणदंड झालेल्याची सुटका करून तुम्ही आपल्या सामर्थ्याची थोरवी सिद्ध करा.

  11. हे याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, तुमच्यासारखे समर्थ परमेश्वर दुसरे कोणी आहे का? विश्वासूपणाचे वलय तुमच्याभोवती आहे.

  12. तुमचे बाहू प्रबळ आहेत; तुमचा हात बळकट आहे, उंचावलेला आहे तुमचा उजवा हात.

  13. प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.

  14. तरीसुद्धा आपल्या नामासाठी, आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी परमेश्वराने त्यांचे तारण केले.

  15. ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.

  16. त्यांनी प्रत्येक गोष्ट, त्याच्या समयात सुंदर अशी बनविली आहे. परमेश्वराने मनुष्याच्या अंतःकरणात अनंतकाळचे जीवन ठेवलेले आहे. तरीसुद्धा परमेश्वराने आरंभापासून शेवटपर्यंत केलेली कृत्ये कोणीही समजू शकले नाहीत.

  17. याहवेहवर कायम भरवसा ठेवा, कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत.

  18. तुम्ही जे फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका. तुम्ही जे जवळ आहात ते, माझे सामर्थ्य मान्य करा!

  19. भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.

  20. सनातनकालापासून मीच परमेश्वर म्हणून अस्तित्वात आहे. माझ्या हातातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. मी जेव्हा कार्य करतो, त्याला कोणीही उलट करू शकत नाही.”

  21. मी माझ्या स्वतःच्या हाताने पृथ्वीचा पाया घातला, आणि माझ्या उजव्या हाताने आकाश आच्छादले; मी जेव्हा त्यांना हजर होण्याची आज्ञा देतो, ते सर्व एकत्र उभे राहतात.

  22. याहवेह आपली पवित्र भुजा सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत, आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल.

  23. मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून अजरामर किर्ती मिळविली,

  24. तुम्ही माझे भय बाळगू नये काय?” असे याहवेह विचारतात. “माझ्या उपस्थितीत तुम्ही थरथर कापू नये काय? सागराच्या सीमारेषा वाळूने मर्यादित मीच केल्या आहेत, एक अनंतकाळची मर्यादा जी ओलांडता येत नाही, म्हणूनच सागर कितीही उसळले, तरी ते विजयी होऊ शकत नाही; त्यांनी कितीही गर्जना केल्या, तरी या सीमांचे त्यांना उल्लंघन करता येत नाही.

  25. परंतु परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.