मुख्य मजकुरावर जा

Sacrifices बद्दल बायबलमधील वचने

248 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याने तो गोर्‍हा सभामंडपाच्या दाराशी आणून त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व याहवेहसमोर त्याचा वध करावा.

  2. मग अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे थोडे रक्त सभामंडपामध्ये नेऊन त्यात आपली बोटे बुडवून

  3. याजकाने पवित्रस्थान वेगळे करणार्‍या पडद्यासमोर याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे.

  4. नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्‍ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे.

  5. नंतर पापार्पणाच्या गोर्‍ह्याची सर्व चरबी, म्हणजे आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी,

  6. दोन गुरदे व त्यावरील कंबरेजवळची चरबी व काळीज काढून त्यांचे वेदीवर होमार्पण करावे.

  7. शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्‍ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे.

  8. परंतु त्या गोर्‍ह्याची कातडी आणि त्याचे सर्व मांस तसेच डोके आणि पाय, आतील अवयव आणि आतडी,

  9. त्या गोर्‍ह्याचे राहिलेले सर्व भाग, छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी, राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडांच्या विस्तवावर जाळून टाकावेत.

  10. जर संपूर्ण इस्राएली लोकांकडून अजाणतेने पाप घडले, आणि याहवेहनी निषिद्ध केलेल्यापैकी एखादी गोष्ट केली, ते केलेले जरी समुदायाला माहीत नसेल, पण जेव्हा त्यांना त्यांची चूक समजून येईल,

  11. आणि त्यांनी केलेले पाप सर्वांना माहीत होईल, तेव्हा त्या समुदायाने पापार्पण म्हणून एक गोर्‍हा आणावा आणि सभामंडपासमोर अर्पण करावा.

  12. तिथे इस्राएली समुदायातील पुढार्‍यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्‍ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा.

  13. नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे काही रक्त सभामंडपात घेऊन जावे.

  14. याजकाने त्याची बोटे त्यात बुडवून याहवेहसमोर पडद्यापुढे ते सात वेळा शिंपडावे.

  15. त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.

  16. त्याने त्यावरील सर्व चरबी काढावी आणि तिचे वेदीवर होम करावे.

  17. पापार्पणाच्या गोर्‍ह्यासंबंधीच्या विधीप्रमाणेच त्याने या गोर्‍ह्याचेही करावे. अशा प्रकारे याजकाने संपूर्ण समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.

  18. नंतर तो गोर्‍हा वस्तीबाहेर काढून, जसा पहिला गोर्‍हा त्याने जाळून टाकला तसाच हा गोर्‍हा जाळून टाकावा. समुदायासाठी हे पापार्पण आहे.

  19. जेव्हा एखादा पुढारी अजाणतेने याहवेह, त्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग करून पाप करतो व दोषी ठरतो,

  20. ज्यावेळी त्याला हे पाप कळून येईल तेव्हा त्याने एका निर्दोष बोकडाचे अर्पण आणावे.

  21. त्याने त्या बोकडाच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व होमार्पणाच्या स्थळी त्याचा वध करून तो याहवेहला अर्पावा. हे त्याचे पापार्पण होय.

  22. मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना ते लावावे व राहिलेले रक्त होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.

  23. शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे या सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशाप्रकारे पुढार्‍याच्या पापाबद्दल, याजक प्रायश्चित करेल आणि त्याची क्षमा होईल.

  24. समुदायातील सामान्य मनुष्याने चुकून पाप केले व याहवेहने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे ते दोषी ठरले,

  25. पण जेव्हा ते त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा त्यांनी आपल्या पापाबद्दल प्रायश्चिताचे अर्पण म्हणून एक निर्दोष शेळी आणावी.