मुख्य मजकुरावर जा

Sacrifices बद्दल बायबलमधील वचने

248 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “याहवेह परमेश्वराशिवाय इतर दैवतांना अर्पणे करणार्‍यांचा नाश करून टाकावा.

  2. “तुम्ही लाच घेऊ नये, कारण लाच डोळस व्यक्तीस आंधळे करते व निरपराध्याचे शब्द विपरीत करते.

  3. “अर्पणातील रक्त खमिराबरोबर मला अर्पण करू नये. “मला अर्पण केलेल्या यज्ञपशूंची चरबी सकाळपर्यंत राहू देऊ नये.

  4. मग त्याने इस्राएलचे तरुण पुरुष पाठविले व त्यांनी याहवेहला होमार्पणे व गोर्‍हे अर्पून शांत्यर्पण केले.

  5. मोशेने त्यातील अर्धे रक्त वाटीत घेतले व अर्धे वेदीवर शिंपडले.

  6. मग मोशेने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांपुढे वाचला. त्यांनी प्रतिसाद दिला, “याहवेहने सांगितले ते सर्वकाही आम्ही करू; आम्ही आज्ञापालन करू.”

  7. मग मोशेने रक्त घेतले, लोकांवर शिंपडले आणि म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, जो याहवेहने त्यांच्या वचनानुसार तुमच्याबरोबर केला आहे.”

  8. “समर्पणाच्या मेंढ्याचे ते भाग म्हणजेच, त्याचे ऊर ज्याची ओवाळणी केली होते व मांडीचा भाग जो सादर केला होता तो अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मालकीचे आहे, ते भाग पवित्र कर.

  9. हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी.

  10. “दररोज तू वेदीवर जे अर्पण करावयाचे आहे ते हे: एक वर्षाची दोन कोकरे.

  11. एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.

  12. याहवेहनी मोशेला बोलाविले आणि सभामंडपातून त्याच्याशी बोलणे केले. ते म्हणाले,

  13. “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा तुमच्यामधील कोणी याहवेहसाठी अर्पण आणतील, तेव्हा तुमच्या गुरांमधील किंवा कळपातील प्राण्यांचे अर्पण आणावे.

  14. “ ‘जर हे होमार्पण गुरांमधून करावयाचे असेल, तर निर्दोष असलेला नरगोर्‍हा तुम्ही अर्पण करावा. तुम्ही ते सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आणावे, म्हणजे ते याहवेहद्वारे मान्य केले जाईल.

  15. तुम्ही तुमचे हात त्या होमार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि प्रायश्चित्त म्हणून तुमच्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वीकारले जाईल.

  16. तुम्ही याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा आणि नंतर अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, ते त्याचे रक्त आणतील आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वेदीभोवती शिंपडतील.

  17. तुम्ही यज्ञपशूची कातडी काढावी आणि पशूचे कापून तुकडे करावे.

  18. अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, त्यांनी वेदीवर अग्नी ठेवावा आणि अग्नीवर लाकडांची रचना करावी.

  19. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी वेदीवर जळत असलेल्या लाकडांवर त्या पशूचे तुकडे, शिर व चरबी यासह व्यवस्थित रचून ठेवावी.

  20. पाय व आतडी पाण्याने धुऊन याजकाने त्या सगळ्यांचे वेदीवर होम करावे. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे. याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

  21. “ ‘जर हे होमार्पण कळपातून आणलेले, मेंढी किंवा शेळी असेल तर तुम्ही दोष नसलेल्या नराचे अर्पण करावे.

  22. तुम्ही याहवेहसमोर वेदीच्या उत्तर दिशेला त्या प्राण्याचा वध करावा आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे.

  23. मग त्या पशूचे कापून तुकडे करावेत आणि याजकाने शिर व चरबी यासह ते तुकडे वेदीवरील लाकडांवर ठेवावे.

  24. त्याची आतडी आणि पाय तुम्ही पाण्याने धुऊन घ्यावीत आणि याजकाने हे सर्व घेऊन यावे आणि त्यांचा वेदीवर होम करावा. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

  25. “ ‘जर याहवेहसाठी पक्ष्यांचे होमार्पण म्हणून अर्पण असेल तर त्याने पारवा किंवा कबुतराची पिल्ले अर्पण करावी.