मुख्य मजकुरावर जा

Sacrifices बद्दल बायबलमधील वचने

248 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून काढावे आणि त्याचे वेदीवर होम करावे; त्याचे रक्त वेदीच्या बाजूला वाहू द्यावे.

  2. त्याने त्या पक्ष्याची चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकावयाच्या जागी फेकून द्यावी.

  3. तो त्याला पंखांच्या मधोमध फाडेल, त्याचे पूर्णपणे तुकडे करणार नाही आणि नंतर याजक त्याचे वेदीवरील जळत्या लाकडांवर होमार्पण करेल. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

  4. “ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा.

  5. प्रत्येक अर्पण मीठ घालून रुचकर करावे, कारण तुमच्या परमेश्वराबरोबर झालेल्या कराराचे मीठ तुमच्या अन्नार्पणात असलेच पाहिजे.

  6. “ ‘जर तुमचे अर्पण हे शांत्यर्पण असेल आणि तुम्ही कळपातील नर किंवा मादी प्राण्याचे अर्पण करीत असाल, तुम्ही निर्दोष असा प्राणी याहवेहसमोर आणावा.

  7. तुम्ही तुमचा हात त्या अर्पणाच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वारात त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत, त्यांनी वेदीच्या भोवती त्याचे रक्त शिंपडावे.

  8. शांत्यर्पणातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण आणावे: अंतर्गत अवयव आणि त्यांना जोडून असलेली सर्व चरबी,

  9. कंबरेजवळ असलेल्या चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग जे तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल.

  10. नंतर अहरोनाच्या पुत्रांनी जळत्या लाकडावर असलेल्या होमार्पणावरील वेदीवर त्याचे हवन करावे. हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

  11. “ ‘परंतु शांत्यर्पणाचे अर्पण म्हणून शेरडामेंढरांतील नर किंवा मादी यांचे याहवेहला अर्पण करावयाचे असेल तर तो पशू निर्दोष असावा.

  12. जर तुम्ही कोकर्‍याचे अर्पण करीत असाल तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे,

  13. तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त अर्पण म्हणून वेदीच्या भोवती शिंपडतील.

  14. शांत्यर्पणातून जे अन्नार्पण तुम्ही याहवेहसाठी आणावयाचे ते हे: त्याची चरबी, पाठीच्या हाडाजवळून कापलेली संपूर्ण चरबीदार शेपटी, आतील अवयव आणि त्याला जोडून असलेली सर्व चरबी,

  15. कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग.

  16. याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून याजक या सर्वाचे वेदीवर हवन करेल.

  17. “ ‘जर तुमचे अर्पण बोकड असेल, तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे,

  18. तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त वेदीच्या भोवती शिंपडतील.

  19. जे काही अर्पण तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून आणता ते अशाप्रकारे असावे: आतील अवयव आणि आतड्यांवरील सर्व चरबी,

  20. कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग.

  21. याजक त्यांचे अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करतील, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. सर्व चरबी याहवेहसाठी आहे.

  22. “ ‘भावी पिढीसाठी हे विधी सर्वकाळासाठी आहेत, जिथे कुठे तुम्ही राहाल: तुम्ही कोणतीही चरबी किंवा कोणतेही रक्त सेवन करू नये.’ ”

  23. याहवेह मोशेला म्हणाले:

  24. “इस्राएली लोकांस सांग की जो कोणी अजाणतेने पाप करून याहवेहच्या नियमानुसार निषिद्ध कृत्ये करत असेल, तर त्याच्यासाठी हे नियम आहेत.”

  25. एखाद्या अभिषिक्त याजकाकडून अजाणतेने घडलेल्या पापामुळे लोकांवर दोष आला, तर पापार्पण म्हणून याहवेहला त्याने एक निर्दोष गोर्‍हा अर्पण करावा.