Skip to content

Rocks बद्दल बायबलमधील वचने

98 वचने · 54 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत, त्यांचे आश्रयाचे खडक कुठे आहेत?

  2. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी त्या तिथे असलेल्या खडकावर ठेव आणि रस्सा त्यावर ओत.” गिदोनाने सूचनांप्रमाणे केले,

  3. तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला.

  4. नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्‍हा अर्पण कर.”

  5. त्यांनी ओरेब व जेब नावांच्या दोन मिद्यानी पुढार्‍यांनाही पकडले. त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ मारले. मग इस्राएली लोकांनी मिद्यानांचा पाठलाग केला आणि ओरेब व जेब यांची शिरे यार्देनेपलीकडे गिदोनाकडे आणली.

  6. मग मानोहाने एक तरुण करडू घेतले आणि ते अन्नबलीसह याहवेहला एका खडकावर अर्पिले आणि जेव्हा मानोहा आणि त्याची पत्नी हे पाहत असताना याहवेहने आश्चर्यकारक कृत्ये केली:

  7. तेव्हा अतिशय क्रूरतेने त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी अनेकांना ठार केले. त्यानंतर तो खाली गेला आणि एटाम खडकातील गुहेत राहू लागला.

  8. जसे ते मागे वळले आणि रानात रिम्मोनाच्या खडकाकडे पळाले, परंतु इस्राएली लोकांनी वाटेतच त्यांच्यापैकी पाच हजार पुरुषांना ठार केले आणि पुढे बिन्यामीन लोकांचा गिदोमापर्यंत पाठलाग करून त्यांचे आणखी पुरुष दोन हजार पुरुष मारून टाकले.

  9. आपण पेचात पडलो आहोत आणि आपले सैन्य दबावात आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिले, तेव्हा ते गुहा आणि झुडूपे, खडक आणि कडे व विवरे यामध्ये लपले.

  10. ज्या घाटांनी योनाथानने पलिष्ट्यांच्या चौकीवर जाण्याची योजना केली होती त्याच्या दोन्ही बाजूंनी शिखरे होती; एका शिखराचे नाव बोसेस व दुसर्‍याचे नाव सेनेह होते.

  11. शौल आणि त्याच्या माणसांनी शोध सुरू केला आणि जेव्हा दावीदाला याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तो खाली खडकाकडे गेला आणि माओनच्या वाळवंटात राहिला. जेव्हा शौलाने हे ऐकले तेव्हा तो दावीदाचा पाठलाग करीत माओनच्या वाळवंटात गेला.

  12. तेव्हा शौलाने दावीदाचा पाठलाग करण्याचे सोडून दिले आणि तो पलिष्ट्यांशी लढण्यास गेला. याच कारणामुळे या ठिकाणाला सेला-हम्माहलेकोथ असे म्हटले जाते.

  13. पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आल्यानंतर शौलाला सांगण्यात आले, “दावीद एन-गेदीच्या वाळवंटात आहे.”

  14. तेव्हा शौलाने सर्व इस्राएलमधून सक्षम असलेले तीन हजार तरुण पुरुष घेतले आणि ते दावीदाचा व त्याच्या माणसांचा शोध करण्यासाठी रानबकर्‍यांच्या खडकाळ भागात गेले.

  15. याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.” तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्‍याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्‍यात नव्हते. त्या वार्‍यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते.

  16. त्याने क्षार खोर्‍यात दहा हजार एदोमी लोकांना ठार केले. त्याने सेला नगरावर हल्ला करून ते जिंकले व त्याचे नाव योकथएल असे ठेवले, आजही ते याच नावाने ओळखले जाते.

  17. जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्‍यात छावणी दिली होती तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेतील खडकाकडे आले.

  18. अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्‍यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले.

  19. यहूदीयाच्या सैन्याने दहा हजार माणसांनासुद्धा जिवंत पकडले, त्यांना एका कड्याच्या टोकावर नेले आणि तिथून खाली फेकले, त्या सर्वांचे तुकडे झाले.

  20. “परंतु जसे पर्वत झिजतात व त्यांचा चुरा होतो, आणि जसे खडक आपल्या ठिकाणातून ढळविले जातात,

  21. लोखंडी कलमाने ते शिसावर, किंवा कायम स्‍वरुपाने खडकावर कोरले असते तर किती बरे होते!

  22. पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात आणि आश्रय नसल्यामुळे ते खडकांचा आधार घेतात.

  23. गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात आणि पर्वतांना समूळ उघडे करतात.

  24. ते खडकामधून भुयारे तयार करतात; आणि त्यांचे डोळे त्यातील मौल्यवान रत्ने पाहतात.

  25. जेव्हा माझी वाट लोण्याने भिजली जात असे आणि खडक माझ्यासाठी जैतुनाच्या तेलाचे झरे ओतून देत असे.