Skip to content

Reward बद्दल बायबलमधील वचने

166 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  2. “जो कोणी आपल्या पित्याच्या पत्नीबरोबर समागम करतो, तो शापित होय, कारण त्याने त्याच्या पित्याचे अंथरूण अपमानित केले आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  3. “जो कोणी एखाद्या पशूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  4. “जो कोणी आपल्या बहिणीबरोबर, त्याच्या पित्याच्या कन्येबरोबर किंवा आपल्या मातेच्या कन्येबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  5. “जो कोणी आपल्या सासूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  6. “जो कोणी आपल्या शेजार्‍याला गुप्तपणे ठार मारतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  7. “जो कोणी एखाद्या निरपराधी मनुष्याला जिवे मारण्यासाठी लाच घेतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  8. “जो कोणी या नियमशास्त्राचे शब्द अमान्य करून ते आचरणात आणत नाही, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  9. सर्व इस्राएली लोक, त्यांच्या वडीलजनांसह, अधिकारी आणि न्यायाधीश हे सर्व याहवेहच्या कराराच्या कोशाच्या दोन्ही बाजूंना उभे होते, ज्या लेवीय याजकांनी तो वाहून आणला त्यांच्यासमोर ते होते. त्यांच्यामध्ये राहणारे परदेशी आणि तिथे जन्मलेले लोक तिथे होते. जशी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने पूर्वी दिली होती, त्याप्रमाणे अर्धे लोक गरिज्जीम पर्वतासमोर आणि अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे राहिले, इस्राएली लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्याने या सूचना दिल्या होत्या.

  10. “धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; वाईट कृत्ये करणे थांबवा.

  11. योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा.

  12. “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.

  13. जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल;

  14. परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत.

  15. परंतु नीतिमानास सांगा त्यांना सुस्थिती येईल. त्यांच्या सत्कृत्यांचे त्यांना प्रतिफळ मिळेल.

  16. पाहा, सार्वभौम याहवेह सामर्थ्याने येत आहेत, आणि ते बलाढ्य हाताने राज्य करतात. पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याबरोबर आहे, आणि ते देत असलेला मोबदला त्यांच्याबरोबर आहे.

  17. ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात: ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात; जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात.

  18. याहवेह म्हणतात, परंतु तुम्ही जर माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, आणि शब्बाथ दिवशी कोणताही भार नगरीच्या प्रवेश व्दारातून नेआण न करता, काहीही काम न करता तो पवित्र दिवस असा पाळलात,

  19. तर असे होईल, दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि अधिपती थाटाने, वैभवाने रथारूढ व अश्वारूढ होऊन येणारे या शहराच्या प्रवेश व्दारातून प्रवेश करतील, आणि त्यांचे सरदार, यहूदीयाचे लोक व यरुशलेमनिवासी या लोकांवर राज्य करतील आणि हे शहर कायम वसलेले राहील.

  20. तेव्हा लोकसमुदाय यहूदीयाच्या शहरातून आणि यरुशलेमच्या परिसरातून, त्याचप्रमाणे बिन्यामीन या प्रांतांच्या डोंगरदऱ्यांच्या नेगेव येथून, पश्चिमेकडील तळवटीतून, सर्व लोक आपआपली होमार्पणे, धान्यार्पणे व ऊद आणतील व याहवेहच्या मंदिरामध्ये त्यांना उपकारस्तुतीची अर्पणे आणतील.

  21. याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.

  22. जर तुम्ही या आज्ञेचे काळजीपूर्वक पालन केले, नंतर दावीदाच्या राजासनावर बसलेले राजे या महालाच्या व्दारातून रथ आणि घोड्यांवर स्वार होऊन, त्यांचे अधिकारी आणि लोक यांच्यासह प्रवेश करतील.

  23. “जो कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करेन.

  24. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे.

  25. कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल.