Skip to content

Reward बद्दल बायबलमधील वचने

166 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण, “जो जीवनावर प्रीती करतो आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे.

  2. त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे.

  3. कारण प्रभूचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. परंतु प्रभूचे मुख जे वाईट करतात त्यांच्याविरुद्ध आहे.”

  4. यास्तव, माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमचे पाचारण आणि निवड दृढ करण्यासाठी होईल तितके प्रयत्न करा. असे केल्यास तुम्ही कधीही अडखळणार नाही किंवा तुमचे पतन होणार नाही,

  5. तर आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या शाश्वत राज्यात तुमचे भव्य स्वागत होईल.

  6. तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.

  7. ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि ज्यावर नवे नाव लिहिलेले असेल तो पांढरा खडाही मी त्या व्यक्तीला देईन, जे तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही माहीत नसेल.

  8. But that which ye have already hold fast till I come.

  9. जे विजय मिळवितात व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करीत राहतात, त्यांना मी राष्ट्रांवर अधिकार देईन.

  10. आणि ते त्यांच्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवून मातीच्या पात्राप्रमाणे त्यांच्या ठिकर्‍या करतील;—

  11. ज्याप्रमाणे मला माझ्या पित्याकडून अधिकार मिळाला आहे, त्याप्रमाणे मी त्यांना पहाटेचा तारा देखील देईन.

  12. मी म्हटले, “महाराज, ते तुम्हाला माहीत आहे.” तेव्हा ते म्हणाले, “जे महान संकटातून निभावून येतात, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकर्‍याच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत.

  13. म्हणूनच, “आज ते येथे परमेश्वराच्या राजासनासमोर, त्यांच्या मंदिरात, त्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. जे राजासनावर बसलेले आहेत, ते त्यांच्या सानिध्यात त्यांना आश्रय देतील.

  14. त्यांना पुन्हा कधी भूक, किंवा तहान लागणार नाही; त्यांना सूर्याचा ताप, किंवा दाहक उष्णता बाधणार नाही.

  15. कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल, ‘ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍याजवळ नेईल,’ ‘आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील.’”

  16. “पाहा, मी लवकर येत आहे! माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार देईन.