मुख्य मजकुरावर जा

Reward बद्दल बायबलमधील वचने

166 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा जर तुम्ही अगदी विश्वासूपणे पाळाल—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने व पूर्ण जिवाने प्रीती कराल व त्यांची सेवा कराल—

  2. तर मी आगोठीचा आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवेन, म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षे व तेलासाठी जैतुनाच्या तेलाचा साठा करता येईल.

  3. मी तुमच्या गुरांसाठी हिरवीगार कुरणे देईन आणि तुम्हीही खाल आणि तृप्त व्हाल.

  4. पण सावध असावे, तुम्ही इतर दैवतांची उपासना व त्यांना नमन करण्याकडे बहकून जाऊ नये.

  5. यास्तव माझ्या या आज्ञा काळजीपूर्वक आपल्या मनात आणि अंतःकरणात साठवून ठेवा; त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा.

  6. त्या आपल्या मुलांना शिकवा. घरी बसलेले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.

  7. त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहाव्या,

  8. म्हणजे जितके दिवस पृथ्वीवर आकाश स्थित आहे, तितके तुमच्या पूर्वजांना याहवेहने देऊ केलेल्या वचनदत्त देशात तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे दिवस असतील.

  9. पाहा, मी आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप ठेवीत आहे—

  10. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या आज्ञा आज मी तुम्हाला देणार आहे, त्या जर तुम्ही पाळल्या, तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल;

  11. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा न मानल्यास, आज मी तुम्हाला ज्या मार्गाने जाण्याची आज्ञा देत आहे त्यापासून भटकून जाल आणि जी दैवते तुम्हाला माहीत नाहीत अशांचे अनुसरण करण्यास सुरुवात कराल, तर तुम्हाला शाप मिळेल.

  12. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जेव्हा या देशाचा ताबा घेण्यासाठी आणतील, तेव्हा तुम्ही गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावा.

  13. हा दुष्ट विचार मनात न आणण्याची खबरदारी घ्या: “कर्जमाफी करण्याचे सातवे वर्ष जवळ आले आहे.” म्हणून तुम्ही एखाद्या इस्राएली बांधवाबद्दल वाईट इच्छा दाखवू नका आणि मदत नाकारू नका. जर तो याहवेहकडे आपले गार्‍हाणे घेऊन गेला, तर ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

  14. तुम्ही त्यांना उदारपणे दिले पाहिजे आणि त्याबद्दल तुम्ही अंतःकरणात कुरकुर करू नये; मग तुम्ही जे काही कराल आणि जे कार्य हातात घ्याल त्यात याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.

  15. देशात नेहमीच गरीब असतील. म्हणून मी तुम्हाला आज्ञा देत आहे की तुमच्या देशातील इस्राएली बांधव जे गरीब आणि गरजवंत आहेत, त्यांना उदारहस्ते मदत करावी.

  16. तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तिची पिल्ले घेऊ शकता, त्यांच्या आईस मात्र तुम्ही अवश्य जाऊ द्यावे; म्हणजे तुमचे कल्याण होईल व तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.

  17. पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील.

  18. तुम्ही तुमच्याजवळ तंतोतंत आणि प्रामाणिक वजने आणि मापे बाळगावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.

  19. तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

  20. आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

  21. तेव्हा लेव्यांनी सर्व इस्राएली लोकांना पुढीलप्रमाणे मोठ्याने म्हणावे:

  22. “जो याहवेहला घृणास्पद अशी मूर्ती कुशल कारागिरांच्या हातांनी घडवितो आणि ती गुप्तपणे ठेवतो तो शापित आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  23. “जो कोणी आपल्या पित्याचा अथवा मातेचा अनादर करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  24. “जो कोणी आपल्या शेजार्‍याच्या सीमेची धोंड बदलतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  25. “जो कोणी आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित होय!” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.