मुख्य मजकुरावर जा

Revenge बद्दल बायबलमधील वचने

75 वचने · 32 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात,’ असे म्हटलेले तुम्ही ऐकले आहे,

  2. पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा.

  3. जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका.

  4. जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा.

  5. यामुळे हेरोदियाने योहानाविरुद्ध डाव धरला होता आणि ती योहानाचा जीव घेण्यास पाहत होती. परंतु ती काही करू शकत नव्हती,

  6. कारण हेरोद योहानाला भीत असे आणि तो नीतिमान व पवित्र मनुष्य आहे म्हणून त्याचे संरक्षण करत असे. हेरोद योहानाचे बोलणे ऐकून गोंधळात पडत असे; तरी त्याचे ऐकून घ्यावयास त्याला आवडे असे.

  7. अखेर योग्य समय आला. हेरोदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दरबारातील मुख्य अधिकारी आणि लष्करातील सेनापती तसेच गालील प्रांतातील प्रमुख नागरिकांना मोठी मेजवानी दिली.

  8. त्या समारंभात हेरोदियेची कन्या आत आली व नृत्य करून तिने हेरोदाला संतुष्ट केले आणि त्याचबरोबर मेजवानीसाठी आलेल्या इतर पाहुणे मंडळीलाही खुश केले. हेरोद राजाने मुलीला म्हटले, “तुला हवे असेल ते माग आणि ते मी तुला देईन.”

  9. शपथ घेऊन व वचन देऊन तो तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्याइतके जे काही तू मला मागशील, ते मी तुला देईन.”

  10. ती बाहेर गेली आणि आपल्या आईला विचारले, “मी काय मागू?” आईने सल्ला दिला, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर माग.”

  11. तुमच्या शत्रूवर प्रेम करा, त्यांचे भले करा आणि परतफेड करण्याची आशा बाळगू नका. असे केले म्हणजे तुम्हाला फार मोठे प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही परात्पराची लेकरे व्हाल, कारण ते अनुपकारी आणि दुष्ट यांनाही दयाळूपणाने वागवितात.

  12. जेव्हा याकोब आणि योहान या शिष्यांनी हे पाहिले, ते म्हणाले, “प्रभूजी, त्या लोकांना भस्म करण्यासाठी आम्ही स्वर्गातून अग्नीची मागणी करावी काय?”

  13. परंतु येशूंनी वळून त्यांना धमकाविले.

  14. हे ऐकल्यावर ते अतिशय संतापले व त्यांना मारून टाकण्याचे त्यांनी ठरविले.

  15. सभागृहातील यहूदी पुढार्‍यांनी हे ऐकले तेव्हा ते भयंकर संतापले आणि त्याच्यावर दात खाऊ लागले.

  16. ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.”

  17. मग दुसर्‍या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत.

  18. जे तुमचा छळ करतात; त्यांना शाप देऊ नका; उलट आशीर्वाद द्या.

  19. एकमेकांशी ऐक्याने राहा. गर्विष्ठ होऊ नका. तर अगदी सामान्य लोकांच्या सहवासात आनंद माना, अहंकार बाळगू नका.

  20. वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा.

  21. माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,” असे प्रभू म्हणतात.

  22. त्याउलट: “तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल.”

  23. कोणी वाईटाची फेड वाईटाने करणार नाही याची काळजी घ्या, परंतु प्रत्येकाचे आणि सर्वांचे सर्वदा चांगले करण्यासाठी झटा.

  24. जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्यांच्याकडे स्वतःला सोपवून दिले.

  25. वाईटाची फेड वाईटाने किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. याउलट, वाईटाची फेड आशीर्वाद देऊन करा, कारण आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे.