Revenge बद्दल बायबलमधील वचने: Punishment for
Punishment for बद्दल वचने
“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘पलिष्टी लोक प्रतिकाराने वागले व निरंतरच्या वैरभावाने यहूदाहचा नाश करण्यासाठी आपल्या हृदयात द्वेषबुद्धी ठेऊन त्यांचा सूड घेतला आहे.
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पलिष्ट्यांविरुद्ध मी माझा हात उगाणार आहे आणि करेथी लोकांना नाहीसे करेन आणि समुद्रकिनार्यावर उरलेल्यांना नष्ट करेन.
मी त्यांच्यावर माझा सूड उगवेन आणि माझ्या क्रोधाने त्यांचा नाश करेन. जेव्हा मी त्यांचा सूड घेईन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”
याहवेह असे म्हणतात: “एदोमच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही. कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केला आणि देशातील स्त्रियांचा वध केला, कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता, आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला,
म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेन आणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.”