मुख्य मजकुरावर जा

Religious Zeal बद्दल बायबलमधील वचने

726 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु मी यापैकी एकाही अधिकाराचा उपयोग केला नाही किंवा हे तुम्ही माझ्यासाठी करावे या उद्देशानेही मी तुम्हाला लिहित नाही. माझा स्वाभिमान कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करेन.

  2. कारण जर मी शुभवार्तेचा प्रचार करतो, तर मला प्रौढी मिरविण्याची गरज नाही, प्रचार करणे हे आवश्यक आहे, जर मी शुभवार्तेचा प्रचार करीत नाही तर माझा धिक्कार असो.

  3. मी प्रचार केला, तर मला त्याचे प्रतिफळ मिळेल; आणि स्वतःहून केला नाही तरी ती पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.

  4. माझा मोबदला काय आहे? तो हा की: शुभवार्तेचा प्रचार करताना तो मोफत करावा आणि शुभवार्तेचा प्रचारक म्हणून आपला अधिकार पूर्णपणे गाजवू नये.

  5. मी स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही आणि तरीही जितक्यांना शक्य आहे तितक्यांना जिंकता यावे म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास करून घेतले आहे.

  6. यहूदीयांना जिंकण्यासाठी मी यहूदीयांसारखा झालो. नियमशास्त्राधीन असणार्‍यांसाठी मीही नियमशास्त्राधीन झालो. वास्तविक मी नियमशास्त्राधीन नाही.

  7. ज्यांना नियमशास्त्र नाही, त्यांना जिंकून घेता यावे म्हणून मीही त्यांच्यासाठी नियमशास्त्र नसल्यासारखा झालो. परमेश्वराच्या नियमांपासून मी बंधमुक्त नाही परंतु ख्रिस्ताच्या नियमांनी बांधला गेलो आहे.

  8. जे अशक्त आहेत त्यांना जिंकण्यासाठी मी अशक्त झालो. मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो आहे, यासाठी की मी कसेही करून काहींचे तारण साधावे

  9. मी हे सर्व शुभवार्तेसाठी करतो यासाठी की मिळणार्‍या आशीर्वादात मलाही वाटेकरी होता यावे.

  10. मी एखाद्या क्रीडापटूप्रमाणे माझ्या शरीरावर ताबा मिळवितो व परिश्रम करून त्याला दास करून ठेवतो, जेणेकरून इतरांना उपदेश केल्यानंतर मी स्वतःच बक्षिसास अपात्र ठरणार नाही.

  11. मी सर्वप्रकारे सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतःचे भले पाहत नाही परंतु अनेकांचे भले पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.

  12. मी ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुसरण करा.

  13. जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्‍या झांजेसारखा आहे.

  14. माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व मी गरिबांना दिली आणि माझे शरीर कष्ट सहन करण्यासाठी अर्पण केले, परंतु माझ्याठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.

  15. तुमच्याबाबतीत असेच आहे. ज्याअर्थी तुम्ही आत्मिक दानांसाठी उत्सुक आहात, तर मग मंडळीची वृद्धी व्हावी यासाठी ती दाने विपुल प्रमाणात मिळावी म्हणून नेहमी प्रयत्न करा.

  16. आता माझ्या बंधूंनो व भगिनींनो, ज्या शुभवार्तेचा मी तुम्हाला प्रचार केला होता, त्याची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, तिचा तुम्ही स्वीकार केला आणि तिच्यामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे आहात.

  17. या शुभवार्तेद्वारे तुमचे तारण झाले, ज्या वचनांचा मी तुम्हाला प्रचार केला त्यावर जर तुम्ही दृढविश्वास ठेवला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे.

  18. प्रथम महत्त्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसार: ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले.

  19. त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले,

  20. आणि केफाला त्यांचे पहिल्यांदा दर्शन घडले, आणि नंतर बारा शिष्यांना.

  21. त्यानंतर पाचशेपेक्षा अधिक बंधू व भगिनींना एकाच वेळी त्यांचे दर्शन घडले, त्यातील बहुतेक आजही जिवंत असले, तरी काहीजण मरण पावले आहेत.

  22. याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले.

  23. सर्वात शेवटी, एखाद्या अवेळी जन्मलेल्यासारखे मला त्यांचे दर्शन झाले.

  24. कारण सर्व प्रेषितांपेक्षा मी सर्वात कनिष्ठ आहे आणि प्रेषित म्हणून घेण्याच्या किंचितही लायकीचा नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला.

  25. आता मी जो काही आहे, तो परमेश्वराच्या कृपेमुळेच आहे; आणि त्यांची माझ्यावरील कृपा व्यर्थ गेली नाही. कारण इतर सर्वांपेक्षा मी अधिक कष्ट केले; परंतु मी नाही तर परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्यामुळे हे झाले.