मुख्य मजकुरावर जा

Purification बद्दल बायबलमधील वचने: Scriptures relating to

60 वचने · 13 पैलू

"Purification" साठी शोधा

Scriptures relating to बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला.

  2. आणि याहवेह मोशेला म्हणाले, “लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावे,

  3. मग मोशे पर्वतावरून खाली उतरून लोकांकडे गेला, त्याने त्यांना शुद्ध केले व लोकांनी आपले कपडे धुतले.

  4. मग अहरोन व त्याच्या पुत्रांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणून त्यांना पाण्याने धुवावे;

  5. “तू कास्याचे गंगाळ व त्याची कास्याची बैठक तयार करावी. ते सभामंडप व वेदीच्या मध्ये ठेवून त्यात पाणी भरावे

  6. अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्यातील पाण्याने आपले हात व पाय धुवावे.

  7. जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात व पाय पाण्याने धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत आणि जेव्हा ते याहवेहला अन्नार्पण करण्याची सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातात,

  8. त्यांनी आपले हात व पाय धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत. हा नियम अहरोन व त्याच्या येणार्‍या वंशाच्या प्रत्येक पिढीसाठी असावा.”

  9. “अहरोन व त्याचे पुत्र यांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणावे व त्यांना पाण्याने धुवावे.

  10. नंतर मोशेने सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरून ठेवले,

  11. आणि मोशे आणि अहरोन व अहरोनाचे पुत्र यांनी आपले हात व पाय धुण्यासाठी त्या पाण्याचा वापर केला.

  12. जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करीत किंवा वेदीजवळ जात, तेव्हा ते आपले हात व पाय धूत असत, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.

  13. नंतर मोशेने अहरोन आणि त्याच्या पुत्रांना पुढे आणले आणि त्यांना पाण्याने आंघोळ घातली.

  14. मग शुद्ध करण्यात येणार्‍या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करावे व स्नान करावे; म्हणजे तो विधिनियमानुसार शुद्ध होईल. त्यानंतर त्याने छावणीत राहण्यासाठी परत यावे. तरी सात दिवसापर्यंत त्याने आपल्या तंबूबाहेरच राहावे.

  15. सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे. मग तो शुद्ध होईल.

  16. ज्या बिछान्यावर तो झोपेल आणि ज्या बैठकीवर तो बसेल ती अशुद्ध होईल.

  17. जे कोणी अशा माणसाच्या अंथरुणाला स्पर्श करतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत ते अशुद्ध राहतील.

  18. स्रावामुळे अशुद्ध झालेला मनुष्य ज्या बैठकीवर बसला असेल त्या बैठकीवर जो कोणी बसेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. त्याने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे.

  19. जो कोणी अशा मनुष्याला स्पर्श करेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  20. ज्या कोणा शुद्ध व्यक्तीवर असा मनुष्य थुंकेल, त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  21. ज्या वाहनांचा तो स्त्राव होणारा मनुष्य उपयोग करेल ते वाहन अशुद्ध होय,

  22. आणि जो कोणी अशा माणसाच्या अंगाखालील वस्तूला स्पर्श करेल किंवा ती उचलेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  23. हात धुतल्याशिवाय स्त्राव होणारा मनुष्य जर कोणाला स्पर्श करेल, तर स्पर्श झालेल्या त्या मनुष्याने अवश्य आपली वस्त्रे धुवावीत आणि पाण्याने स्नान करावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  24. “असा मनुष्य ज्या मातीच्या पात्राला स्पर्श करेल ते अवश्य फोडून टाकावे आणि कोणत्याही लाकडाच्या भांड्याला त्याचा स्पर्श झाल्यास ते पाण्याने धुऊन घ्यावे.

  25. “स्राव थांबल्यावर त्याने आपली वस्त्रे धुऊन, सात दिवसांच्या शुद्ध होण्याच्या विधीची सुरुवात करावी. त्याने आपली वस्त्रे धुवावी आणि वाहत्या पाण्यात स्नान करून शुद्ध व्हावे.