Skip to content

Ploughing बद्दल बायबलमधील वचने

21 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्याने त्याचे नाव नोआह असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.”

  2. एकाच नांगराला बैल व गाढव यांना एकत्र जुंपून नांगरणी करू नये.

  3. त्या पहिल्या हल्ल्यात योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाने सुमारे अर्ध्या एकर जमिनीवर वीस माणसे मारली.

  4. म्हणून एलीयाह तिथून निघाला आणि त्याला शाफाटचा पुत्र अलीशा दिसला. नांगराला बारा बैल जुंपून तो नांगरणी करीत होता आणि तो स्वतः बाराव्या बैलाच्या जोडीवर होता. एलीयाह त्याच्याकडे गेला व आपला झगा त्याच्यावर टाकला.

  5. एक निरोप्या इय्योबाकडे आला आणि म्हणाला, “बैल नांगरीत होते व गाढवे जवळपास चरत होती,

  6. मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात आणि दुःख पेरतात तेच त्यांची कापणी करतात.

  7. शेतकर्‍याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.

  8. आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत; म्हणून हंगामाच्या वेळी शोधून त्यांना काहीही मिळणार नाही.

  9. ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील, आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  10. जेव्हा शेतकरी लागवडीसाठी नांगरतो तेव्हा तो सतत नांगरतो का? तो सतत ढेकळे मोडून मातीत काम करीत राहतो का?

  11. मग त्याने शेत नांगरून तयार केले, तर तो त्यात शहाजिरे व जिऱ्याची पेरणी करत नाही काय? तो गव्हाच्या ठिकाणी गहू आणि जव सरीने लावत नाही का? आणि ज्वारीच्या वाफ्यात ज्वारी पेरत नाही का?

  12. अपरिचित लोक तुमचे कळप राखतील; विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील.

  13. यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांना याहवेह असे म्हणतात: “तुमची कठीण भूमीवर नांगरून घ्या, काट्यांमध्ये बीजारोपण करू नका.

  14. एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. तिला मळणी करण्याची आवड आहे; म्हणून मी तिच्या नाजूक मानेवर जू ठेवेन. मी एफ्राईमला नांगराला जुंपेन, यहूदाहला नांगरणी करणे व याकोबाला माती फोडणे आवश्यक आहे.

  15. तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.

  16. पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली आहे आणि अन्यायाचे पीक काढले आहे, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले आहे. कारण तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर आणि आपल्या अनेक योद्धांवर विश्वास ठेवला आहे,

  17. घोडे खडकाळ कडांवर पळतात काय? बैल घेऊन कोणी समुद्र नांगरतो काय? पण तुम्ही न्यायाला विषामध्ये आणि नीतिमत्तेच्या फळाला कडवटपणामध्ये बदलले आहे;

  18. ते देशांमधील अनेक लोकांचा न्याय करतील, दूरदूरच्या बलाढ्य राष्ट्रांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  19. पण येशूंनी त्याला सांगितले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो परमेश्वराच्या राज्यास उपयोगी नाही.”

  20. “समजा, तुमच्यापैकी एकाजवळ शेत नांगरण्यासाठी किंवा मेंढरे राखण्यासाठी एक नोकर आहे. आपला नोकर शेतावरून आल्यानंतर, ‘ये, भोजनास बस,’ असे त्याचा धनी त्याला म्हणेल काय?

  21. हे खात्रीने त्यांनी आपल्यासाठी म्हटले नाही का? होय, हे आमच्यासाठी लिहिण्यात आले आहे, कारण जो कोणी नांगरतो आणि मळणी करतो, त्यांनी हंगामाच्या पिकात वाटा मिळेल या आशेने करावी.