Skip to content

Pillars बद्दल बायबलमधील वचने

42 वचने · 27 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. खांबांवर असलेल्या प्रत्येक कळसांना सात साखळीच्या विणलेल्या जाळ्या बसविल्या होत्या.

  2. खांबांच्या वरच्या कळसांना सजविण्यासाठी त्याने प्रत्येक जाळ्याला गोलाकारात दोन रांगेत डाळिंबे बनविली. प्रत्येक कळस त्याने असेच घडविले.

  3. द्वारमंडपात असलेल्या खांबांवरील कळस कमळांच्या फुलांच्या आकाराचे, चार हात उंच होते.

  4. दोन्ही खांबांच्या कळसांना लागून वाटीच्या आकाराच्या जाळीभोवती, दोनशे डाळिंबाच्या रांगा केलेल्या होत्या.

  5. त्याने हे खांब मंदिराच्या द्वारमंडपाकडे ठेवले. दक्षिणेकडे ठेवलेल्या खांबाला त्याने याखीन आणि उत्तरेकडील खांबाला बवाज असे नाव दिले.

  6. शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात कठडे बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. तेव्हापासून आजपर्यंत हे चंदन ना कुठे आणले गेले ना ते कोणाच्या दृष्टीस पडले.)

  7. सजावटीचे पडदे पांढर्‍या आणि निळ्या रंगांचे होते आणि ते पांढर्‍या रंगाच्या कापडी फितींनी व जांभळ्या कापडांनी रुपेरी कड्यांना बसविलेल्या संगमरवरी खांबांना बांधलेले होते. संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर सोन्याचे व रुप्याची लाल-जांभळी रत्ने, संगमरवरी, मौल्यवान मोती व इतर रत्नजडित आसने ठेवलेली होती.

  8. लोखंडी कलमाने ते शिसावर, किंवा कायम स्‍वरुपाने खडकावर कोरले असते तर किती बरे होते!

  9. परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात, त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात.

  10. पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले, तरी तिचे स्तंभ मीच स्थिर करून ठेवतो. सेला

  11. त्याचे खांब चांदीचे आहेत, त्याचे तळ सोन्याचे आहे. त्यातील बैठक जांभळ्या वस्त्रांची आहे, तिच्या आतील भागाला यरुशलेमच्या कन्यांनी प्रेमाने वेलबुट्टीने मढविले आहे. यरुशलेमच्या तरुणीकडून प्रेमपूर्वक भेट.

  12. त्याचे पाय शुद्ध सोन्याच्या कोंदणात बसविलेले संगमरवरी स्तंभच आहेत. त्याचे रूप लबानोनासारखे आहे, उत्तम देवदारूसारखे आहे.

  13. आज मी तुला तटबंदीचे नगर केले आहे, या संपूर्ण राष्ट्राविरुद्ध उभे राहण्यासाठी लोहस्तंभासारखे व भक्कम कास्य दरवाजांसारखे केले आहे—यहूदीयाचे राजे, त्यांचे अधिकारी, याजक आणि लोक या सर्वांविरुद्धच.

  14. जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.

  15. जर माझे येणे थोडेसे लांबले, तर परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.

  16. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या परमेश्वराच्या मंदिरातील स्तंभ करेन. ते तिथून कधीही बाहेर जाणार नाहीत. माझ्या परमेश्वराचे नाव, स्वर्गातून माझ्या परमेश्वरापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या परमेश्वराची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव मी त्याच्यावर लिहेन.

  17. मग मी आणखी एक पराक्रमी देवदूत, स्वर्गातून उतरतांना पाहिला. त्याने मेघांचे वेष्टण घातले होते. त्याच्या मस्तकाच्या वरती मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि त्याचे पाय अग्नी स्तंभासारखे होते.