Skip to content

Palaces बद्दल बायबलमधील वचने

48 वचने · 36 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांचे ठिकाण ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही वस्ती न करो.

  2. त्यांनी आपले पवित्रस्थान अत्युच्च बांधले, आणि पृथ्वीसारखे त्यांनी कायमचे निश्चित केले.

  3. मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या परिपक्व रोपांसारखे होतील; आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या कोरीव स्तंभासारख्या होतील.

  4. पाल, त्यांना हाताने पकडणे शक्य आहे, तरीपण त्या राजांच्या महालात सापडतात.

  5. ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्यावर चांदीचे बुरूज बांधू. ती जर दार असती तर आम्ही तिला, गंधसरूच्या फळ्यांनी झाकून टाकले असते.

  6. तरस प्राणी तिच्या गडांवर वस्ती करतील, कोल्हे तिच्या आलिशान राजवाड्यांमध्ये वस्ती करतील. तिची वेळ फार जवळ आली आहे, आणि तिचे दिवस लांबणार नाहीत.

  7. गडाचा त्याग करण्यात येईल, गजबजलेली शहरे रिकामी होतील; किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील, जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील,

  8. काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील, जंगली झाडे आणि रानटी काटेरी झुडूपे तिचे गड ग्रासून टाकतील. कोल्ह्यांना संचार करण्याची ती जागा होईल, घुबडांचे घर होईल.

  9. कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला आणि त्याने आमच्या गडात प्रवेश केला आहे; त्याने रस्त्यांवरून बालकांना आणि तुमच्या तरुणांना चौकातून काढून घेतले आहे.

  10. परंतु जर तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळण्याचे ऐकले नाही, शब्बाथ दिवशी यरुशलेमच्या या प्रवेश व्दारातून इतर दिवशी करता तसे मालाचे भार आणले, तर मी या यरुशलेमचे प्रवेश व्दार पेटवून त्याचा पूर्णपणे विध्वंस करेन, जो अग्नी कधीही विझणार नाही, जो तेथील गड भस्म करेल.’ ”

  11. त्याने त्यांचे किल्ले मोडले आणि त्यांची नगरे उद्ध्वस्त केली. तो देश व त्यातील राहणारे सर्वजण त्याच्या गर्जनेने भयभीत झाले.

  12. मग राजाने आपल्या दरबारातील प्रमुख अधिकारी अश्पनजास राजघराण्यातील काही इस्राएली आणि कुलीन लोकांना राजाच्या सेवेत आणण्याचा आदेश दिला—

  13. शारीरिक दोष नसलेले तरुण पुरुष, देखणे, सर्वप्रकारच्या विद्येत निष्णात, ज्ञानसंपन्न, समजण्यास त्वरित आणि राजाच्या महालात सेवा करण्यास पात्र. त्याने त्यांना खाल्डियन भाषा व विद्या शिकवावी.

  14. राजाने स्वतःच्या भोजनातून रोजचे भोजन आणि द्राक्षारसातून देण्याचा आदेश दिला. त्यांना तीन वर्षे प्रशिक्षित करावे आणि त्यानंतर त्यांना राजाच्या सेवेत आणावे.

  15. मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो.

  16. मग राजा आपल्या महालात परतला व काहीही जेवण न करता आणि कोणतीही करमणूक न करता त्याने संपूर्ण रात्र काढली आणि त्याला झोप येत नव्हती.

  17. अश्दोदच्या गडांना आणि इजिप्तच्या गडांना ही घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतावर एकत्र व्हा; तिच्यामधील गोंधळ आणि तिच्या लोकांवरील अत्याचाराकडे पाहा.”

  18. “जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात, “त्यांनी लुटलेला व चोरी केलेला माल त्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.”

  19. यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “एक शत्रू जो तुमचा देश व्यापून टाकेल, तो तुमचे किल्ले कोसळून टाकेल आणि तुमचे गड लुटेल.”

  20. ते पुरुष आपली शांती असतील जेव्हा अश्शूरी आपल्या देशावर हल्ला करतील आणि आपल्या किल्ल्यांमध्ये प्रवेश करतील, तेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध सात मेंढपाळ, आठ देखील सेनापती उभे करू,

  21. परंतु पेत्र काही अंतरावरून त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला. त्याने प्रवेश केला आणि पहारेकर्‍यांसोबत जाऊन काय होते ते पाहत बसला.

  22. जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही. भारी पोशाख घालणारे व सुखविलासातील लोक राजवाड्यात राहतात.

  23. “जोपर्यंत एखादा बळकट मनुष्य, पूर्ण सशस्त्र होऊन आपल्या घराची रखवाली करतो, तोपर्यंत त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.