Skip to content

Oil बद्दल बायबलमधील वचने

97 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.

  2. ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील; याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी— धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल, गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील. भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील.

  3. याप्रकारे तू सोन्या-चांदीने नटली; तुझी वस्त्रे रेशमी आणि किमती व नक्षीकाम केलेले सुंदर तुझे कपडे होते. मध, जैतुनाचे तेल आणि सपीठ तुझे अन्न होते. तू अति सुंदर होऊन राणी होण्यास योग्य झालीस.

  4. तू एका सुंदर पलंगावर बसलीस, ज्यापुढे एक मेज ठेवलास त्यावर जे माझे होते ते धूप व जैतुनाचे तेल ठेवले.

  5. “ ‘यहूदाह व इस्राएलने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचे वेतन म्हणून त्यांनी तुला मिन्नीथचा गहू व मेवा, मध, जैतुनाचे तेल आणि मलम दिले.

  6. कारण त्यांची आई अविश्वासू आहे आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन, जे मला माझे अन्न आणि माझे पाणी, माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’

  7. तिने ओळखले नाही की, तो मीच होतो ज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले, ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले; जे त्यांनी बआलसाठी वापरले.

  8. “आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेल यांना प्रतिसाद देईल, आणि ते येज्रीलास प्रतिसाद देतील.

  9. एफ्राईम वाऱ्यावर चरतो; तो दिवसभर पूर्वेकडील वाऱ्याचा पाठलाग करतो आणि खोटेपणा व हिंसाचार वाढवितो. तो अश्शूरसोबत करार करतो आणि इजिप्तला जैतून तेल पाठवितो.

  10. याहवेहने त्यांना उत्तर दिले: “मी तुम्हाला धान्य, नवा द्राक्षारस व जैतून तेल पाठवित आहे, जे तुम्हाला तृप्त करण्यास भरपूर आहे; पुन्हा कधीही मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये उपहासाचा विषय होऊ देणार नाही.

  11. खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील; आणि कुंडे तेलाने आणि द्राक्षारसाने ओसंडून वाहू लागतील.

  12. तू पेरणी करशील पण कापणी करणार नाही; तुम्ही जैतून फळे तुडवाल, पण ते तेल वापरणार नाही, तू द्राक्षे चिरडशील, पण त्याचा द्राक्षारस पिणार नाही.

  13. मी शेतावर, डोंगराळ भागांवर, धान्यावर, नव्या द्राक्षारसावर, जैतुनाच्या तेलावर व इतर सर्व ज्यांची भूमीतून उपज होते, लोकांवर आणि पशूंवर, तसेच तुमच्या हाताच्या कष्टाच्या कमाईवर मी अवर्षण बोलाविले आहे.”

  14. जेव्हा कोणी वीस मापे धान्याच्या राशीची अपेक्षा केल्यास, तिथे फक्त दहा मापेच धान्य मिळत असे. जर कोणी द्राक्षकुंडातून पन्नास मापे द्राक्षारस काढला, तर त्याला वीसच मापे मिळत असे.

  15. मी पुन्हा त्याला विचारले, “तसेच तेल ओतणार्‍या सोन्याच्या दोन नळ्यांजवळ दोन जैतुनाच्या फांद्या का आहेत?”

  16. मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.

  17. त्यांनी पुष्कळ भुते काढली, अनेक आजार्‍यांना तैलाभ्यंग केले आणि त्यांना बरे केले.

  18. तू माझ्या डोक्यावर तेल लावले नाहीस, परंतु हिने तर माझ्या पायांवर सुगंधी अत्तर ओतून दिले आहे.

  19. त्याच्याजवळ जाऊन त्या मनुष्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून पट्ट्या बांधल्या. त्याला आपल्या गाढवावर बसवून तो एका उतारशाळेत आला आणि त्याने त्याची सेवा केली.

  20. “तो म्हणाला, ‘नऊशे बथ जैतुनाचे तेल.’ ” यावर कारभारी म्हणाला, “हा तुझा सहीचा करारनामा घे आणि तो फाडून टाक, व दुसरा करारनामा घेऊन त्यावर चारशे पन्नास आकडा मांड.

  21. मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल; येशूंच्या पायावर ओतले आणि तिने त्यांचे पाय आपल्या केसांनी पुसले आणि त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले.

  22. तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी.