Oil बद्दल बायबलमधील वचने: Miraculous increase of
Miraculous increase of बद्दल वचने
अलीशाने तिला विचारले, “मी तुला कशी मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग?” ती म्हणाली, “एका कुपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय तुमच्या दासीजवळ काहीही नाही.”
अलीशा म्हणाला, “आजूबाजूला जा आणि तुझ्या सर्व शेजार्यांकडून रिकामी भांडी मागून घे. थोडकी मागू नको.
आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दार लावून घे. नंतर जैतुनाचे तेल तू सर्व भांड्यात भर आणि ते भांडे भरले की एका बाजूला ठेव.”
तिने त्याला सोडले आणि तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागून दार बंद केले. त्यांनी भांडे तिच्याकडे आणले आणि ती ओतत राहिली.
जेव्हा प्रत्येक भांडे भरले गेले. ती तिच्या मुलाला म्हणाली, “आणखी काही भांडी माझ्याकडे आण.” पण त्याने म्हटले, “आता एकही भांडे शिल्लक राहिले नाही.” तेव्हा तेल वाहणे बंद झाले.