मुख्य मजकुरावर जा

Ingratitude बद्दल बायबलमधील वचने

62 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा दावीदाची माणसे तिथे आली, त्यांनी दावीदाच्या नावाने हा निरोप नाबालास दिला व ते वाट पाहत राहिले.

  2. नाबालने दावीदाच्या सेवकांना उत्तर दिले, “कोण हा दावीद? कोण हा इशायाचा पुत्र? आजकाल पुष्कळ सेवक त्यांच्या मालकांपासून पळून जात आहेत.

  3. जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्‍यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?”

  4. तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले.

  5. तुझ्या धन्याचे घर मी तुला दिले आणि तुझ्या धन्याच्या स्त्रिया तुझ्या बाहूंमध्ये दिल्या. मी तुला संपूर्ण इस्राएल आणि यहूदीया दिले. आणि हे सर्व फार थोडेच होते तर, मी तुला अधिक दिले असते.

  6. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते करून तू याहवेहचा शब्द का अवमानीत केला आहेस? उरीयाह हिथी याला तू तलवारीने मारून टाकलेस आणि त्याची पत्नी तू आपली स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस. तू त्याला अम्मोन्यांच्या तलवारीने ठार मारलेस.

  7. हनानीचा पुत्र येहूकडे बाशासंबंधी याहवेहचे जे वचन आले ते हे:

  8. “मी तुला धुळीतून उचलून माझ्या इस्राएली लोकांवर अधिकारी नेमले, परंतु तू यरोबोअमचा मार्ग अनुसरला आहेस व माझ्या इस्राएली लोकांना पाप करावयाला भाग पाडले आणि त्यांच्या पापामुळे माझा क्रोध भडकविला आहे.

  9. म्हणून मी बाशा व त्याच्या घराण्याला नाहीसे करेन आणि मी तुझ्या घराण्याला नेबाटाचा पुत्र यरोबोअम याच्या घराण्यासारखे करेन.

  10. यरुशलेममध्ये त्याने बुरुजावर आणि कोपऱ्यांवरील संरक्षणांसाठी वापर करण्यासाठी शोध लावलेली उपकरणे बनविली. ज्यामुळे सैनिक बाण मारू शकतील आणि भिंतीवरून मोठे दगड फेकू शकतील. त्याची किर्ती दूर पसरली, कारण तो सामर्थ्यशाली होईपर्यंत त्याला खूप मदत झाली होती.

  11. परंतु उज्जीयाह सामर्थ्यवान झाल्यावर त्याचा गर्विष्ठपणा त्याला नाशाकडे घेऊन गेला. तो त्याचे परमेश्वर याहवेह यांच्याबरोबर अविश्वासू झाला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला.

  12. त्यांनी खडकाळ सुळक्यातून पाण्याचे झरे काढले आणि नद्यांप्रमाणे पाण्याला वाहविले.

  13. असे असतानाही त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड करणे आणि देवाधिदेवाविरुद्ध पाप करणे सुरूच ठेवले.

  14. त्यांनी धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा पाऊस पाडला, समुद्रातील वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला.

  15. त्यांनी त्यांच्या छावणीच्या आत, त्यांच्या तंबूच्या सभोवती खाली यावयास लावले.

  16. त्यांनी अधाशीपणाने तृप्त होईपर्यंत खाल्ले— त्यांनी जे मागितले होते, ते सर्व त्यांना दिले.

  17. पण त्यांना जे पाहिजे त्यापासून समाधानी होण्यापूर्वी, जेवण अद्यापही त्यांच्या मुखात असतानाच,

  18. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला; त्यांच्या धष्टपुष्टांस ठार करून, इस्राएलच्या तरुणांना खाली पाडले.

  19. इतके सर्व झाले तरी ते लोक पाप करीतच राहिले; त्यांच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

  20. त्यांनी असे विचारले नाही, ‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले, वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले, निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले, ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले, ते याहवेह कुठे आहेत?’

  21. मी तुम्हाला एका सुपीक भूमीवर घेऊन आलो, तिची उपज आणि तिचे उत्तमोत्तम पदार्थ खाण्यासाठी आणले. परंतु तुम्ही ती भूमी अशुद्ध केली आणि माझे वतन अमंगळ केले.

  22. मी तुला दिलेले उत्तम दागिने तू घेतले, दागिने जे माझ्या सोन्याचांदीचे बनले होते, ते घेऊन तू त्याच्या पुरुषमूर्ती बनविल्या आणि त्यांच्याशी वेश्यावृत्ती करू लागली.

  23. तू आपल्या नक्षीदार कापडाने त्यांना झाकले आणि मी तुला दिलेले तेल व अत्तर त्यांना अर्पण केले.

  24. मी तुला दिलेले भोजन; म्हणजेच सपीठ, जैतुनाचे तेल आणि मध, जे मी तुला खायला दिले; ते तू सुवासिक धूप म्हणून त्यांना अर्पण केले. हे असेच घडले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  25. “ ‘आणि ज्यांना माझ्यापासून जन्म दिला ते आपले पुत्र व कन्यांना तू मूर्तींना अन्न म्हणून अर्पण केले. तुझी वेश्यावृत्ती पुरेशी नव्हती काय?