Skip to content

Ingratitude बद्दल बायबलमधील वचने

62 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या लेकरांचा तू वध केला आणि मूर्तींना यज्ञ केला.

  2. तुझी सर्व अमंगळ कृत्ये आणि तुझी वेश्यावृत्ती यामध्ये तुझे तारुण्यातील दिवस, जेव्हा तू नग्न व उघडी, तुझ्या रक्तात लोळत होती त्याची आठवण तुला राहिली नाही.

  3. परंतु जेव्हा त्यांचे अंतःकरण गर्विष्ठ झाले व गर्वाने फुगून ताठ झाले, तेव्हा त्यांना राजासनावरून काढण्यात आले व त्यांचे वैभवही हिरावून घेण्यात आले.

  4. त्यांना लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि प्राण्याचे मन देण्यात आले; ते रानगाढवांमध्ये राहिले आणि बैलासारखे गवत खात असत; आणि त्यांचे शरीर आकाशाच्या दवबिंदूंनी भिजले होते, जोपर्यंत त्यांनी हे मान्य केले नाही की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि त्यांना पाहिजे त्याला ते राज्यांचा अधिपती म्हणून नियुक्त करतात.

  5. तिने ओळखले नाही की, तो मीच होतो ज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले, ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले; जे त्यांनी बआलसाठी वापरले.

  6. “म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन, आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन. तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी, मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन.

  7. इस्राएलच्या लोकांनो, हे वचन ऐका, जे याहवेह तुमच्याविरुद्ध बोलले आहेत—त्या संपूर्ण घराण्याविरुद्ध आहे ज्यांना मी इजिप्तमधून बाहेर आणले आहे:

  8. “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधून मी फक्त तुझीच निवड केली आहे; म्हणून तुझ्या सर्व पापांबद्दल मी तुला शिक्षा करेन.”

  9. “हे माझ्या लोकांनो, मी तुम्हाला काय केले आहे? मी तुमच्यावर कोणते ओझे टाकले आहे? मला उत्तर द्या.

  10. मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले आणि तुम्हाला गुलामगिरीतून देशातून मुक्त केले. मी मोशेला तुमचे नेतृत्व करण्यास पाठवले, अहरोन आणि मिर्यामलाही पाठवले.

  11. येशूंनी विचारले, “मी दहा लोकांना शुद्ध केले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत?

  12. परमेश्वराचे गौरव करण्यासाठी हा एकटाच आणि तोही परकीय मनुष्य आला काय?”