Skip to content

Enemy बद्दल बायबलमधील वचने

57 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह माझ्या परमेश्वरा आपल्या नीतिमत्तेने मला निर्दोष जाहीर करा; त्यांनी मजविरुद्ध आनंद करू नये.

  2. त्यांनी असे मनात बोलू नये, “हा हा हा! आम्हाला असेच हवे होते; आम्ही त्याला गिळून टाकले.” असे त्यांना बोलू देऊ नका.

  3. माझी संकटे पाहून आनंद करणार्‍यांना लज्जित आणि निराश करा; जे माझ्यापुढे प्रौढी मिरवितात, त्यांना लज्जित आणि अपमानित करा.

  4. परंतु माझे कल्याण व्हावे असे इच्छा करणार्‍या सर्वांना मोठा आनंद प्राप्त होऊ द्या; त्यांना आनंदाने ओरडू द्या, “आपल्या सेवकाला आनंदाने साहाय्य करणारे याहवेह किती थोर आहेत.”

  5. माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार आणि दिवसभर तुमची उपासना करीत राहणार.

  6. कारण दुष्ट आणि कपटी लोकांनी माझ्याविरुद्ध त्यांचे मुख उघडले आहे; ते माझ्याविरुद्ध असत्य गोष्टी बोलले आहेत.

  7. त्यांनी द्वेषपूर्ण शब्दांचा माझ्यावर वर्षाव केला; विनाकारण ते माझ्यावर हल्ला करतात.

  8. माझ्या मैत्रीच्या बदल्यात ते माझ्यावर आरोप करतात, परंतु मी निरंतर प्रार्थना करणारा मनुष्य आहे.

  9. ते बर्‍याची फेड वाईटाने करतात आणि प्रीतीच्या मोबदल्यात द्वेष करतात.

  10. प्रवाशांचे आराधना गीत. “माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,” इस्राएल म्हणो;

  11. “माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे, तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही.

  12. शेतकर्‍याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.

  13. जेव्हा तुझा शत्रू पडतो तेव्हा आनंद करू नकोस; जेव्हा ते अडखळतात तेव्हा तुझे मन आनंदित होऊ नये,

  14. नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील.

  15. तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल तर त्याला प्यावयास पाणी दे.

  16. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल, आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील.

  17. “ ‘तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा आणि शत्रूंचा द्वेष करा,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे.

  18. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

  19. अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्‍या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात.

  20. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली, तर त्यात तुम्हाला असे कोणते मोठे श्रेय मिळणार आहे? जकातदारही तसेच करतात की नाही?

  21. आणि तुम्ही आपल्या बंधूनाच अभिवादन करीत असाल तर इतरांहून चांगले ते काय करता? गैरयहूदी तसेच करतात की नाही?

  22. म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.”

  23. “पण तुम्ही जे माझे ऐकत आहात, त्यांना मी सांगतोः तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे भले करा.

  24. जे तुम्हाला शाप देतात, त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमच्याबरोबर वाईट वागतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

  25. जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली, तर त्यांच्यापुढे दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा काढून घेतला, तर त्यांना तुमची बंडीही घेण्यास मनाई करू नका.