Enemy बद्दल बायबलमधील वचने: The wickedness of David's enemy
The wickedness of David's enemy बद्दल वचने
कारण दुष्ट आणि कपटी लोकांनी माझ्याविरुद्ध त्यांचे मुख उघडले आहे; ते माझ्याविरुद्ध असत्य गोष्टी बोलले आहेत.
त्यांनी द्वेषपूर्ण शब्दांचा माझ्यावर वर्षाव केला; विनाकारण ते माझ्यावर हल्ला करतात.
माझ्या मैत्रीच्या बदल्यात ते माझ्यावर आरोप करतात, परंतु मी निरंतर प्रार्थना करणारा मनुष्य आहे.
ते बर्याची फेड वाईटाने करतात आणि प्रीतीच्या मोबदल्यात द्वेष करतात.
प्रवाशांचे आराधना गीत. “माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,” इस्राएल म्हणो;
“माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे, तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही.
शेतकर्याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.