मुख्य मजकुरावर जा

Egypt बद्दल बायबलमधील वचने

328 वचने · 105 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इजिप्त देशामध्ये धान्य मिळते, हे जेव्हा याकोबाच्या कानी गेले, तेव्हा तो आपल्या पुत्रांना म्हणाला, “एकमेकांच्या तोंडाकडे नुसते पाहत का उभे राहिलात?”

  2. मग त्याने पुढे म्हटले, “इजिप्तमध्ये धान्य मिळत आहे, असे मी ऐकले आहे. तुम्ही तिथे जा आणि आपल्यासाठी थोडे धान्य विकत घेऊन या, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”

  3. मग योसेफाचे दहा भाऊ, धान्य विकत घेण्यासाठी इजिप्तमध्ये गेले.

  4. परंतु याकोबाने योसेफाचा भाऊ बिन्यामीन याला, त्यांच्याबरोबर पाठविले नाही, कारण त्याला काही अपाय होईल अशी त्याला भीती वाटत होती.

  5. अशा रीतीने इस्राएलचे पुत्र इतर लोकांबरोबर इजिप्तमध्ये धान्य खरेदीसाठी आले, कारण दुष्काळ कनान देशातही पडला होता.

  6. योसेफ हा इजिप्त देशाचा अधिकारी असल्यामुळे तो सर्व लोकांना धान्यविक्री करीत असे. जेव्हा त्याचे भाऊ तिथे आले, त्यांनी त्याच्यापुढे जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.

  7. योसेफ एकटाच जेवला; आणि त्याच्या भावांना वेगळ्या पंक्तीत बसविले; त्याचप्रमाणे इजिप्त लोकांचीही वेगळीच पंगत होती, कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांना तुच्छ लेखीत आणि त्यांच्या पंक्तीला बसून कधीही भोजन करीत नसत.

  8. प्रत्येकाने कुठे बसावे हे त्याने सांगितले आणि त्यांना ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत त्यांच्या वयाप्रमाणे बसविले, यावर फार आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे पाहू लागले.

  9. योसेफ, जी पक्वान्ने खात होता, तीच पक्वान्ने त्यांनाही वाढण्यात आली. पण बिन्यामीनाला इतर भावांपेक्षा पाचपट अधिक वाढण्यात आले. ते सर्व त्याच्यासोबत भरपूर जेवले व मनमुरादपणे पिऊन तृप्त झाले.

  10. आता मात्र आपल्या सेवकांसमोर योसेफाचा भावनावेग अनावर झाला आणि तो मोठ्याने ओरडला, “सगळ्यांनी माझ्या समक्षतेतून बाहेर जावे!” योसेफाने तिथे कोणी नसताना स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट केले.

  11. मग तो इतक्या मोठमोठ्याने रडू लागला की, ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोहच्या घराण्यातील लोकांनीही ते ऐकले.

  12. तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे! माझे वडील अद्याप जिवंत आहेत काय?” परंतु त्याचे भाऊ इतके घाबरले होते की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडेना.

  13. तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, “माझ्याजवळ या!” ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, “ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे!

  14. तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले.

  15. दुष्काळ पडून आता दोनच वर्षे झाली आणि अद्यापही पाच वर्षे आहेत. त्या काळात नांगरणी व कापणी अजिबात होणार नाही.

  16. परंतु पृथ्वीवर जे उरले आहेत, त्या तुम्हाला वाचवण्यासाठी आणि मोठ्या मुक्तिद्वारे तुमचे जीवन सुरक्षित करण्यासाठी परमेश्वराने मला तुमच्या आधी इथे पाठवले आहे.

  17. “म्हणजे आता तुम्ही नव्हे तर खुद्द परमेश्वरानेच मला इकडे पाठविले. त्यांनीच मला फारोहचा सल्लागार, त्याच्या घराण्याचा व्यवस्थापक आणि संपूर्ण इजिप्त देशाचा अधिपती केले आहे.

  18. आता त्वरा करा आणि माझ्या वडिलांकडे जाऊन त्यांना सांगा की, तुमचा पुत्र योसेफ असे म्हणतो: ‘परमेश्वराने मला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे, म्हणून आता क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडे येथे या.

  19. म्हणजे तुम्ही, तुमची मुले व तुमची नातवंडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि जे सर्वकाही तुमचे आहे, त्यासह तुम्हाला येथे गोशेन प्रांतात राहता येईल.

  20. मी तुमची या ठिकाणी काळजी घेईन, कारण आपल्यापुढे दुष्काळाची अजून पाच वर्षे आहेत आणि तुम्ही इकडे आला नाही तर, तुम्ही तुमच्या सर्व कुटुंबासह निराधार व्हाल.’

  21. योसेफाचे भाऊ आले आहेत ही बातमी फारोहपर्यंत पोहोचली, तेव्हा ती ऐकून फारोहला आणि त्याच्या अधिकार्‍यांना अतिशय आनंद झाला.

  22. फारोह योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग, ‘आपली जनावरे लादा आणि झटपट कनान देशातील आपल्या घरी जा,

  23. आणि तुमचे वडील व सर्व कुटुंबीय मंडळी यांना इजिप्तमध्येच राहण्यासाठी घेऊन या. त्यांना सांगा, फारोह तुम्हाला इजिप्त देशातील सर्वात सुपीक प्रदेश बहाल करेल म्हणजे या देशातील उत्तम पदार्थ तुम्हाला खावयास मिळतील.’

  24. “आणि तुझ्या भावांना असेही सांग, ‘तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमचे वडील यांना घेऊन येण्यासाठी इजिप्तमधून गाड्या घेऊन जा.

  25. तुमच्या मालमत्तेची काळजी करू नका, कारण इजिप्त देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच होईल.’ ”