मुख्य मजकुरावर जा

Company बद्दल बायबलमधील वचने

66 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि मी हे देखील म्हणालो, ‘मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देणार नाही; ते तुम्हाला काट्यांसारखे होतील आणि त्यांची दैवते तुम्हाला सापळे होतील.’ ”

  2. परंतु सर्व दुष्ट लोक काट्यांसारखे फेकले जातील, जे हाताने गोळा करता येत नाहीत.

  3. जे कोणी काट्यांना गोळा करतात ते लोखंडी साधन किंवा भाल्याचा दांडा वापरतात; ते जागीच भस्म केले जातात.”

  4. कपटी लोकांसोबत मी बसत नाही किंवा ढोंगी लोकांची संगत मी धरत नाही.

  5. दुष्कर्म करणार्‍यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही.

  6. याहवेहनी तशी आज्ञा केली असूनही, त्यांनी इतर राष्ट्रातील लोकांचा नाश केला नाही.

  7. उलट ते अन्य राष्ट्रात मिसळले, आणि त्यांच्या प्रथा आत्मसात केल्या.

  8. धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!

  9. जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात मी बराच काळ घालविला आहे.

  10. मी तर शांतताप्रिय आहे; पण मी काही बोलताच ते युद्धास तयार होतात.

  11. याहवेह, तुमचा द्वेष करणार्‍यांचा मीही द्वेष करू नये काय आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्‍यांचा मी तिरस्कार करू नये काय?

  12. मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना माझे शत्रू मानतो.

  13. माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस.

  14. जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या;

  15. आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”—

  16. माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस;

  17. तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल.

  18. सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.

  19. दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्‍यांच्या मार्गाने जाऊ नकोस.

  20. त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा,

  21. तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका,

  22. नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल.

  23. याहवेहचा शक्तिशाली हात माझ्यावर ठेवून मला असे म्हणतात, या लोकांच्या मार्गाचे अनुसरण करू नकोस:

  24. “ज्या सर्वाला हे कारस्थान म्हणतात त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही कारस्थान म्हणू नका; त्यांना ज्याचे भय वाटते त्याला तुम्ही भिऊ नका, आणि त्याची धास्ती घेऊ नका.

  25. “एफ्राईम गैर यहूदीयांसोबत मिसळतो; एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.