Abiram
Abiram चा उल्लेख असलेली वचने
लेवीचा पुत्र कोहाथ, त्याचा पुत्र इसहार, त्याचा पुत्र कोरह, आणि रऊबेन गोत्रातील काही लोक म्हणजे एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम व पेलेथाचा पुत्र ओन हे उन्मत्त झाले
मग मोशेने एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम यांना बोलाविले. परंतु त्यांनी म्हटले, “आम्ही येणार नाही!
“कोरह, दाथान आणि अबीराम यांच्या तंबूपासून सर्व समुदायाला दूर व्हावयाला सांग.”
तेव्हा मोशे दाथान व अबीराम यांच्या तंबूकडे धावत गेला. त्याच्यामागे इस्राएली पुढारीही गेले.
मग कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबूंपासून ते दूर गेले. दाथान व अबीराम हे आपल्या पत्नी, मुले व तान्ही बाळे यांच्यासह आपआपल्या तंबूंच्या दारांशी येऊन उभे राहिले.
आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.
रऊबेनाचा वंशज एलियाब, याचे पुत्र दाथान व अबीराम यांचे त्यांनी काय केले, जेव्हा पृथ्वीने सर्व इस्राएली छावणीच्या मध्यभागी आपले तोंड उघडले आणि तिने त्यांना, त्यांच्या घरादारांना, त्यांच्या डेर्यांना आणि त्यांच्या सर्व मालकीचे सर्व जिवंत प्राणी कसे गिळून टाकले हे तुमच्या मुलांनी पाहिले नाही.
मग पृथ्वी उघडली आणि तिने दाथानाला गिळून टाकले; अबीराम व त्याच्या समुहाला दफन केले.