Skip to content

Commandments बद्दल बायबलमधील वचने

394 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आम्ही कोणाचेही अन्न विकत घेतल्याशिवाय खाल्ले नाही; याउलट, तुमच्यातील कोणावरही ओझे होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस परिश्रम आणि कष्ट केले.

  2. याचा अर्थ तुमच्यापासून मदत मिळण्याचा अधिकार आम्हाला नाही असे नाही, परंतु आम्ही हे यासाठी केले की तुम्ही आमचे अनुकरण करावे म्हणून तुम्हाला आदर्श झालो.

  3. आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.”

  4. तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो.

  5. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावे.

  6. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सत्कृत्य करीत असताना खचून जाऊ नका.

  7. जो कोणी या पत्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या बोधाचे पालन करणार नाही त्याची विशेष दखल घ्या व त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून दूर राहा.

  8. त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासणाऱ्या बंधूला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या.

  9. तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी.

  10. अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्‍यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे.

  11. म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे.

  12. स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे,

  13. तर जे परमेश्वराची भक्ती करणार्‍यांना शोभेल, अशा आचरणामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे.

  14. स्त्रियांनी शांतपणे व नम्रतेने शिकावे.

  15. स्त्रियांनी पुरुषांना शिकवावे किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवावा, याला मी परवानगी देत नाही; परंतु त्यांनी शांत राहावे.

  16. तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा.

  17. तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा.

  18. तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, त्याने आपल्या लेकरांना आज्ञाधारक ठेवावे आणि हे सर्व आदरयुक्तरितीने करावे.

  19. (ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तर तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल?)

  20. अध्यक्ष नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा, नाही तर तो गर्वाने फुगून जाऊन सैतानाच्या दंडाचा भागीदार होईल.

  21. तसेच मंडळीच्या बाहेरील लोकांचेही त्याच्याविषयी चांगले मत असावे, जेणेकरून त्याची निंदा होऊ नये आणि सैतानाच्या फासात तो पडू नये.

  22. मंडळीतील सेवकही आदरयोग्य व निष्कपट असावेत. ते मद्यपान करणारे नसावे व अप्रामाणिकपणे पैसा मिळविणारे नसावे.

  23. ते विश्वासाचे गुप्त सत्य शुद्ध विवेकबुद्धीने राखणारे असावेत.

  24. आणि त्यांची प्रथम चाचणी करणे आवश्यक आहे; नंतर निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवक म्हणून काम करावे.

  25. त्याचप्रमाणे, त्यांच्या पत्नीदेखील आदरणीय असाव्यात. त्या निंदानालस्ती करणार्‍या असू नयेत, तर त्या नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात.