Skip to content

Commandments बद्दल बायबलमधील वचने

394 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत.

  2. आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या.

  3. आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे.

  4. यास्तव, आपण इतक्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेले आहोत, तेव्हा अडखळण करणारी प्रत्येक गोष्ट व सहज गुंतविणारे पाप बाजूला टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे.

  5. आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्‍या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.

  6. ज्यांनी आपणाविरुद्ध पाप करणार्‍यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा म्हणजे तुम्ही थकून न जाता तुमच्या मनांचा धीर सुटणार नाही.

  7. पापाविरुद्ध तुमच्या संघर्षात, तुम्ही रक्त सांडेपर्यंत पापाशी झगडला नाही.

  8. आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाले, “माझ्या पुत्रा, प्रभूच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू नकोस, त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस,

  9. यास्तव, आपले गळणारे हात व निर्बल गुडघे सशक्त करा.

  10. “आणि तुमच्या पावलांसाठी मार्ग सरळ करा,” म्हणजे लंगडे पडून अपंग होणार नाही, उलट बरे होतील.

  11. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व पवित्र होण्याचा झटून प्रयत्न करा; पवित्रतेशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही.

  12. परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा.

  13. कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपल्या ज्येष्ठत्वाच्या वतनाचा हक्क विकला, त्या एसावासारखे अनीतिमान होऊ नये, म्हणून लक्ष द्या.

  14. बंधुप्रीतिमध्ये जडून राहा.

  15. अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे.

  16. तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा, जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्‍यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा.

  17. तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या.

  18. चांगले कार्य करण्यात आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना भागीदार करण्यास विसरू नका, कारण असे यज्ञ परमेश्वराला फार संतोष देतात.

  19. आपल्या पुढार्‍यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.