Skip to content

Allegory बद्दल बायबलमधील वचने

22 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. एकदा वृक्षांनी त्यांच्यासाठी राजाला अभिषिक्त करण्यास गेले. ते जैतून वृक्षाला म्हणाले, ‘तू आमचा राजा हो!’

  2. “परंतु जैतून वृक्षाने उत्तर दिले, ‘ज्याद्वारे दैवत आणि मनुष्य या दोघांचा सन्मान होतो ते माझे तेल देणे मी सोडून इतर वृक्षांवर हलतडुलत राहावे काय?’

  3. “नंतर ते वृक्ष अंजिराच्या वृक्षास म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो!’

  4. “परंतु अंजिराच्या वृक्षाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी मी माझे माधुर्य आणि चांगली फळे देण्याचे सोडून द्यावे का?’

  5. “मग ते वृक्ष द्राक्षवेलास म्हणाले, ‘ये आणि आमचा राजा हो.’

  6. “परंतु द्राक्षवेलाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी दैवत व मनुष्यांना आनंदित करणारा द्राक्षारस देण्याचे मी सोडून द्यावे का?’

  7. “अखेरीस सर्व वृक्ष काटेरी झुडूपाला म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो.’

  8. “ते काटेरी झुडूप त्या वृक्षांना म्हणाला, ‘तुमचा राजा म्हणून माझा अभिषेक व्हावा अशी तुमची इच्छा आहे, हे जर सत्य असेल तर या आणि माझ्या सावलीचा आश्रय घ्या; पण जर तसे नसेल तर काटेरी झुडूपातून अग्नी निघो व तो लबानोनाचे गंधसरू भस्म करून टाको!’

  9. लांडगा कोकऱ्याबरोबर राहील, चित्ता बकरीबरोबर झोपेल, वासरे आणि सिंह एकत्र राहतील; आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल.

  10. गाई अस्वलाबरोबर चरतील, त्यांची पिल्ले एकत्र झोपतील, आणि सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.

  11. लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल, आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल.

  12. वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल; अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल. केशराच्या फुलाप्रमाणे,

  13. त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.

  14. अशक्त हात बळकट करा, निर्बल झालेले गुडघे स्थिर करा;

  15. भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”

  16. तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान उघडले जातील.

  17. तेव्हा पांगळे हरिणाप्रमाणे उड्या मारतील, आणि मुकी जीभ आनंदाने ओरडेल. अरण्यामध्ये पाणी आणि वाळवंटात झरे उफाळून वर येतील.

  18. तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल, आणि तहानलेल्या जमिनीवर उफाळणारे झरे येतील. जिथे कधी कोल्हे निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.

  19. आणि तिथे एक महामार्ग असेल; त्याला पवित्रतेचा मार्ग म्हटले जाईल; तो त्यांच्यासाठी असेल जे त्या पवित्र मार्गावरून चालतात. अशुद्ध असलेले त्यावरून प्रवास करणार नाहीत. दुष्ट मूर्ख लोक त्यावरून चालणार नाहीत.

  20. तिथे कोणताही सिंह नसेल, किंवा कोणताही वखवखलेला हिंस्र पशू नसेल. ते तिथे सापडणार नाहीत. फक्त तारण झालेलेच तिथे चालतील,

  21. आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.

  22. अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.