मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी आपला करार तुम्हाला घोषित केला, दहा आज्ञा, ज्या पालन करण्याची त्यांनी आज्ञा दिली आणि त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या.

  2. आणि त्यावेळी याहवेहने मला आज्ञा केली की तुम्ही यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेणार आहात तिथे तुम्हाला जे विधी व नियम पाळायचे आहेत ते शिकवावे.

  3. याकरिता सावधगिरी बाळगा, कारण याहवेह तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीमधून बोलले, त्यावेळी त्यांची काहीही आकृती तुमच्या दृष्टीस पडली नाही;

  4. म्हणून कोणत्याही पुरुष अथवा स्त्रीच्या आकाराची कोरीव मूर्ती करून तुम्ही स्वतःला भ्रष्ट करू नये,

  5. किंवा पृथ्वीवरील एखाद्या पशूची किंवा आकाशात उडणार्‍या कोणत्याही पक्ष्याची,

  6. अथवा जमिनीवर रांगणार्‍या कोणत्याही प्राण्याची किंवा पृथ्वीच्या खाली जलामध्ये असणार्‍या कोणत्याही मत्स्याची तुम्ही प्रतिमा करू नये.

  7. जेव्हा तुम्ही वर आकाशाकडे बघाल आणि तुम्हाला सूर्य, चंद्र व तारे—आकाशातील सर्व नक्षत्र—दिसतील, तेव्हा त्यांची उपासना करण्याच्या आणि त्यांना दंडवत घालण्याच्या मोहात पडू नका. याहवेह तुमच्या परमेश्वराने आकाशाखाली असलेल्या पृथ्वीतलावरील इतर राष्ट्रांना ते वाटून दिले आहेत.

  8. परंतु याहवेहने तुम्हाला इजिप्तच्या तप्त लोखंडी भट्टीतून यासाठी सोडवून आणले की, तुम्ही त्यांचे खास निवडलेले लोक, त्यांचे वारसदार व्हावे, जसे तुम्ही आज आहात.

  9. पण तुमच्यामुळेच याहवेह माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला शपथपूर्वक सांगितले आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी वतनादाखल दिलेल्या त्या उत्तम देशात यार्देन ओलांडून तुला जाता येणार नाही.

  10. तुला याच देशात मरावे लागणार; मी यार्देन पार करू शकणार नाही; परंतु तुम्ही मात्र पार करून तो उत्तम प्रदेश वतन म्हणून ताब्यात घ्याल.

  11. तेव्हा सावधगिरी बाळगा, नाहीतर याहवेह तुमच्या परमेश्वराने मनाई केलेल्या वस्तूंची तुम्ही स्वतःसाठी कोरीव प्रतिमा कराल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराचे तुम्हाला विस्मरण होईल.

  12. कारण याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणारे अग्नी व ईर्ष्यावान असे परमेश्वर आहेत.

  13. तुम्हाला जेव्हा मुले आणि नातवंडे होतील आणि त्या देशात तुम्ही बराच काळ वास्तव्य केल्यावर तुम्ही मूर्तिपूजा करून स्वतःला भ्रष्ट केले, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यावर अतिशय कोपायमान होतील,

  14. तर मी सांगतो की तुमच्याविरुद्ध स्वर्ग व पृथ्वी ही दोन्हीही साक्षी असतील, मग तुम्ही यार्देन पार करून जो देश ताब्यात घ्याल, त्या देशात तुमचा लवकरच नाश होईल. तुमचे तेथील वास्तव्य अगदी अल्पकाळ असेल व तुमचा संपूर्णपणे नायनाट होईल.

  15. याहवेह, तुमची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग करतील आणि ज्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला घेऊन जातील त्यांच्यापैकी फक्त काही लोकच मागे उरतील.

  16. तिथे तुम्ही लाकूड आणि दगडाच्या मानवनिर्मित दैवतांची सेवा कराल, जे पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, खाऊ शकत नाहीत किंवा वासही घेऊ शकत नाहीत.

  17. परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील.

  18. तुमच्यावर यातना व अनेक दुःखाचे प्रसंग येतील, तेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि त्यांचे आज्ञापालन कराल.

  19. कारण याहवेह तुमचे परमेश्वर हे कनवाळू आहेत. ते तुम्हाला सोडणार वा टाकणार नाहीत किंवा त्यांनी तुमच्या पूर्वजांशी केलेला शपथपूर्वक करार ते विसरणार नाहीत.

  20. परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील:

  21. तुम्ही नगरात शापित व्हाल व शेतात शापित व्हाल.

  22. तुमच्या टोपल्या व तुमचे पीठ मळण्याचे परात शापित होईल.

  23. तुमच्या पोटचे फळ आणि तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स आणि तुमच्या कळपातील वासरे शापित होतील.

  24. तुम्ही आत याल तेव्हा शापित व्हाल आणि तुम्ही बाहेर जाल तेव्हा शापित व्हाल.

  25. जर तुम्ही याहवेहचा त्याग करून दुष्कर्मे करीत राहिलात तर तुम्ही ज्या कार्यात हात घालाल त्या प्रत्येक गोष्टीत याहवेह शाप, गोंधळ आणि संकटे आणतील व सरतेशेवटी तुमचा अचानक आणि संपूर्णपणे नाश करतील.