मुख्य मजकुरावर जा

Afflictions and Adversities बद्दल बायबलमधील वचने

526 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जो देश तुम्ही प्रवेश करून ताब्यात घेणार आहात, त्या देशातून तुम्ही समूळ नष्ट होईपर्यंत, याहवेह तुम्हावर मरी पाठवतील.

  2. याहवेह तुम्हावर क्षयरोग, ज्वर, दाह, साथीचे रोग व अवर्षण, तांबेरा व बुरशी पाठवतील, तुमचा संपूर्ण नाश होईपर्यंत या पीडा तुमचा पिच्छा पुरवतील.

  3. तुमच्या डोक्यावरील आकाश कास्यासारखे होऊन तुमच्या पावला खालील भूमी लोखंडासारखी होईल.

  4. पावसाच्या ऐवजी याहवेह तुमच्यावर, तुमचा नाश होईपर्यंत, धुळीच्या व वाळूच्या वादळांचा आकाशातून वर्षाव करतील.

  5. तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव व्हावा, असे याहवेह करतील. तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने चाल करून जाल, पण सात दिशांनी गोंधळून पळ काढाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकरिता तुम्ही भयानक विनाशाचे उदाहरण व्हाल.

  6. तुमची प्रेते पक्ष्यांचे आणि वन्यपशूंचे भक्ष्य होतील आणि त्यांना दूर हाकलून देण्यास तिथे कोणीही नसेल.

  7. याहवेह तुम्हावर इजिप्त देशातील गळवे, मूळव्याध, खवडे व खरूजाच्या अशा पीडा आणतील की ज्यातून तुम्ही कधीच बरे होणार नाही.

  8. याहवेह तुम्हाला वेडे व आंधळे करतील आणि तुमची मने गोंधळून जातील.

  9. ज्याप्रमाणे एखादा आंधळा मनुष्य चाचपडतो तसे, तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात चाचपडाल. जे काही तुम्ही हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळणार नाही; तुमच्यावर सतत जुलूम होत राहील आणि तुम्ही सतत लुबाडले जाल, यातून कोणीही तुम्हाला सोडविणारा राहणार नाही.

  10. तुमच्या वाग्दत्त वधूला दुसराच कोणी नेईल व तिचे शीलभंग करेल. तुम्ही घर बांधाल, पण त्यामध्ये तुम्ही राहणार नाही. तुम्ही द्राक्षमळा लावाल, पण त्या फळांचा उपभोग तुम्ही करू शकणार नाही.

  11. तुमच्या डोळ्यादेखतच तुमच्या बैलांची कत्तल करण्यात येईल, पण त्यांचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमच्यासमक्ष तुमची गाढवे जबरदस्तीने हाकलून नेण्यात येतील, पण ती तुम्हाला परत देणार नाहीत. तुमची मेंढरे तुमच्या शत्रूंना देण्यात येतील आणि त्यांना कोणीही सोडविणार नाही.

  12. तुमच्या पुत्र व कन्यांना दुसर्‍या देशात देण्यात येईल आणि तुमचे डोळे त्यांना पाहण्याच्या उत्कट इच्छेने क्षीण होतील आणि तुम्ही तुमचे हातही वर उचलण्यास असमर्थ व्हाल.

  13. तुम्ही कष्ट करून वाढविलेली पिके एखादे परकीय राष्ट्र, ज्याचे नावही तुम्ही कधी ऐकले नाही, ते खातील. तुमची नेहमीच छळवणूक होईल व तुम्ही नेहमीच चिरडले जाल.

  14. तुमच्यासमोर जे येईल ते पाहून तुम्हाला वेड लागेल.

  15. याहवेह तुमच्या गुडघ्या व पायावर कधीही बरी होणार नाही अशी वेदना देणारी फोडी येऊ देतील, जे अगदी तुमच्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत भरून जातील.

  16. तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना कधीही माहीत नसलेल्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला आणि तुम्ही स्वतःवर नेमलेल्या राजाला हद्दपार करतील. तिथे तुम्ही इतर दैवतांची उपासना कराल, जे लाकडाचे आणि दगडाचे दैवत असेल.

  17. याहवेह तुम्हाला अशा सर्व राष्ट्रांमध्ये ओढून नेतील, जिथे तुम्ही भयाचा, म्हणीचा आणि उपहासाचा विषय बनाल.

  18. तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील.

  19. तुम्ही द्राक्षमळे लावून त्यांची निगा राखाल; पण तुम्हाला द्राक्षे खावयाला मिळणार नाहीत किंवा द्राक्षारस प्यावयास मिळणार नाही. कारण कीड त्यांना खाऊन टाकेल.

  20. तुमच्या सर्व देशात जैतुनाची झाडे वाढतील, पण तुम्ही तेलाचा उपयोग करू शकणार नाही. तुम्हाला तेल लावण्यासाठी पुरेसे जैतून तेल मिळणार नाही, कारण त्यांची फळे गळून जातील.

  21. तुम्हाला पुत्र व कन्या होतील, पण त्यांना तुम्ही ठेऊ शकणार नाही, कारण ते गुलामगिरीत जातील.

  22. टोळधाड येऊन तुमच्या भूमीवरील वृक्षांचा आणि पिकांचा नाश करतील.

  23. तुम्हामध्ये राहणारे परदेशी लोक तुमच्यावर अधिकाधिक वरचढ होत जातील, पण तुमची अधिकाधिक अधोगती होत जाईल.

  24. ते तुम्हाला उसने देतील, पण तुम्ही त्यांना उसने देऊ शकणार नाही. ते मस्तक होतील आणि तुम्ही शेपूट व्हाल.

  25. हे सर्व शाप तुमच्यावर येतील. ते तुमचा नाश होईपर्यंत पाठपुरावा करतील आणि तुम्हाला गाठतील, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही व ज्या आज्ञा आणि विधी त्यांनी तुम्हाला दिले त्याचे पालन करण्याचे नाकारले.