मुख्य मजकुरावर जा

Adultery बद्दल बायबलमधील वचने

242 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्या स्त्रिया व्यभिचार करतात व रक्तपात करतात त्यांची शिक्षा मी तुला देईन; मी आपल्या कोपाने व ईर्ष्येच्या क्रोधाने तुझ्यावर रक्तदोष आणेन.

  2. ते तुझ्या विरोधात टोळी आणतील, जे तुला धोंडमार करून आपल्या तलवारीने तुझे तुकडे करतील.

  3. ते तुझी घरे जाळतील व अनेक स्त्रियांदेखत तुला शिक्षा करतील. मी तुझ्या वेश्यावृत्तीचा अंत करेन आणि यापुढे तू तुझ्या प्रियकरांना आणखी वेतन देणार नाहीस.

  4. “समजा एक नीतिमान मनुष्य आहे जो न्याय्य व योग्य आहे तेच करतो जे.

  5. तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करीत नाही किंवा मासिक पाळीच्या वेळी स्त्रीबरोबर लैंगिक संबंध करीत नाही.

  6. तो माझे विधी पाळतो आणि विश्वासूपणे माझे नियम राखतो. तो मनुष्य न्यायी आहे; तो निश्चित जगेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  7. परंतु ज्या व्यभिचार करतात आणि रक्त सांडतात, त्या स्त्रियांना नीतिमान न्यायाधीश दंड देतील, कारण त्या व्यभिचारी आहेत आणि त्यांचे हात रक्ताने भरले आहेत.

  8. लोकांचा जमाव त्यांना धोंडमार करतील आणि त्यांना तलवारीने कापतील; ते त्यांच्या मुलांना व मुलींना जिवे मारतील आणि त्यांची घरे जाळून टाकतील.

  9. “देशातील अश्लीलतेचा मी शेवट करेन, म्हणजे सर्व स्त्रिया सावध राहतील आणि तुमच्याप्रमाणे त्या करणार नाही.

  10. इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका. या देशात राहणार्‍यांवर याहवेहचा आरोप आहे: या देशात विश्वासूपणा नाही, प्रीती नाही, परमेश्वराप्रती ज्ञान नाही.

  11. या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून, चोरी आणि व्यभिचार आहे; सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात, आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो.

  12. जुना द्राक्षारस आणि नवीन द्राक्षारस त्यांचा समंजसपणा दूर करतात.

  13. “माझा करार लेवी वंशाशी होता, जीवन आणि शांतीचा करार आणि मी हे सर्व त्याला दिले; हे प्राप्त व्हावे म्हणून आदर करण्याची गरज होती आणि त्याने मला आदर दिला व माझ्या नामाचे भय बाळगले.

  14. “ ‘तू व्यभिचार करू नको,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे.

  15. पण मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेच्या दृष्टीने पाहतो, त्याने तिच्याबरोबर आपल्या अंतःकरणात आधीच व्यभिचार केला आहे.

  16. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो तो तिला व्यभिचाराचे भक्ष करतो आणि सोडलेल्या स्त्रीशी जो कोणी लग्न करतो तो व्यभिचार करतो.

  17. कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदा ही बाहेर पडतात;

  18. मी तुम्हाला सांगतो, व्यभिचाराच्या कारणाशिवाय जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”

  19. “कोणत्या आज्ञा?” त्याने विचारले. येशूंनी उत्तर दिले, “ ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको,

  20. कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे,

  21. त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.

  22. आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्‍या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.”

  23. तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तू फसवू नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ”

  24. “जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो आणि जो पुरुष सूटपत्र दिलेल्या स्त्रीसोबत विवाह करतो तो व्यभिचार करतो.”

  25. तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ”