Skip to content

Adultery बद्दल बायबलमधील वचने

242 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि ते येशूंना म्हणाले, “गुरुजी, या स्त्रीला व्यभिचाराचे कृत्य करीत असतानाच धरले आहे.

  2. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्हास आज्ञा दिली आहे की अशा स्त्रियांना दगडमार करावा. परंतु आपण काय म्हणता?”

  3. मग येशू सरळ उभे राहून तिला म्हणाले, “बाई, ते कुठे आहेत? तुला कोणीही दोषी ठरविले नाही काय?”

  4. ती म्हणाली “कोणी नाही, प्रभू!” येशू जाहीरपणे म्हणाले, “तर मग मीही तुला दोषी ठरवीत नाही. जा आणि तुझे पापमय जीवन सोडून दे.”

  5. फक्त त्यांना एवढेच लिहून कळवावे की, त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून आणि गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि रक्ताचे सेवन करण्यापासून स्वतःला दूर ठेवावे.

  6. मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल. निरोप द्यावा.

  7. यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे.

  8. सर्वप्रकारचा दुष्टपणा व वाईटपणा, लोभ आणि दुष्टता यांनी ते भरले. ते द्वेष, खुनशीपणा, कलह, खोटेपणा, कटुता आणि कुटाळकी यांनी ते भरून गेले.

  9. अशा गोष्टी करणार्‍यांना मरण रास्त आहे, हा परमेश्वराच्या नीतिमत्वाचा आदेश ठाऊक असूनही, ते या गोष्टी करीतच राहिले, इतकेच नव्हे तर, जे करतात त्यांनाही मान्यता दिली.

  10. पती जिवंत असताना, तिने दुसर्‍या पुरुषाशी संबंध ठेवले तर तिला व्यभिचारिणी म्हणतात; पण पती मरण पावल्यावर ती त्या नियमापासून मुक्त होते; नंतर तिने दुसर्‍या पुरुषाशी विवाह केला, तर ती व्यभिचारिणी होत नाही.

  11. या आज्ञा आहेत, “तू व्यभिचार करू नको,” “तू खून करू नको,” “तू चोरी करू नको,” “तू लोभ धरू नको,” आणि इतर दुसर्‍या कोणत्याही आज्ञा असतील तरी, “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा,” या एका आज्ञेत सर्व आज्ञा समाविष्ट आहेत.

  12. दिवस आहे तोपर्यंत आपली वागणूक सभ्य असू द्या. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका.

  13. मला असा अहवाल मिळाला आहे की तुमच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आहे, की जी गैरयहूदीही खपवून घेणार नाहीत; कोणाएका मनुष्याने आपल्या वडिलांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत.

  14. आणि तुम्ही अभिमान बाळगता! याउलट दुःखाने ज्या मनुष्याने असे केले, त्याला सहभागितेतून घालवून द्यावयाचे नव्हते का?

  15. मी शरीराने अनुपस्थित असलो तरी आत्म्याने उपस्थित आहे आणि उपस्थित असल्यासारखा मी प्रभू येशूंच्या नावाने जो हे कृत्य करीत आहे त्याचा न्याय करून चुकलो आहे.

  16. आपल्या प्रभू येशूंच्या शक्तीने युक्त असा माझा आत्मा व तुम्ही एकत्र मिळून

  17. या मनुष्याला देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, यासाठी की त्याचा आत्मा प्रभूच्या दिवशी तारला जावा.

  18. तुम्ही गर्व करणे उचित नाही. थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते, हे तुम्हाला माहीत नाही का?

  19. या जुन्या खमिराला काढून टाका, म्हणजे तुम्ही एक नवीन अखमीर गोळा तयार व्हाल, जे वास्तविक तुम्हीच आहात. कारण ख्रिस्त आपल्यासाठी वल्हांडणाचा कोकरा म्हणून अर्पिले गेले.

  20. आपण सण साजरा करू या, जुन्या भाकरीच्या खमिराने, द्वेष आणि दुष्टपणाने नव्हे तर त्याऐवजी प्रामाणिकपणाने व सत्याने अखमीर भाकरीने साजरा करू या.

  21. तुम्हाला लिहिलेल्या पत्रात तुम्ही जारकर्मी लोकांमध्ये मिसळू नये असे मी म्हटले होते.

  22. जे अनीतिमान, लोभिष्ट, फसविणारे आणि मूर्तिपूजक अशा या जगाच्या लोकांविषयी मी बोलत नव्हतो, अन्यथा तुम्हाला हे जग सोडून जावे लागेल.

  23. मी तुम्हाला लिहित आहे की आपण बंधू किंवा भगिनी आहोत असा दावा करीत असतानाही जे जारकर्म किंवा लोभी, निंदक, मूर्तिपूजक, मद्य प्राशन करणारे आहेत अशांमध्ये मिसळू नका. अशा लोकांबरोबर भोजनास देखील बसू नका.

  24. मंडळीच्या बाहेर जे आहेत त्यांचा न्याय मी का करावा? परंतु जे आत आहेत त्यांचा न्याय करू नये का?

  25. बाहेरच्या लोकांचा न्याय करणारे परमेश्वर आहेत. “या दुष्ट मनुष्याला तुमच्यामधून काढून टाका.”