circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- योहान ९:३०सुमारे इ.स. ३३
तेव्हा त्याने उत्तर दिले, “हे केवढे आश्चर्य आहे! त्याने माझे डोळे उघडले आणि तो मात्र कुठून आला याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही!
- योहान ९:३१सुमारे इ.स. ३३
आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर पापी लोकांचे ऐकत नाही. तर जे कोणी परमेश्वर भक्त असून त्यांच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्यांचेच ते ऐकतात.
- योहान ९:३२सुमारे इ.स. ३३
कोणी जन्माधांचे डोळे उघडले, असे कधीच ऐकण्यात आले नाही.
- योहान ९:३३सुमारे इ.स. ३३
ही व्यक्ती परमेश्वरापासून नसती, तर हे करू शकली नसती.”
- योहान ९:३४सुमारे इ.स. ३३
तेव्हा यहूदी पुढारी म्हणाले, “तू जन्मापासून पापात बुडलेला आहेस आणि आम्हाला शिकवितोस?” आणि त्यांनी त्याला बाहेर घालविले.
- योहान ९:३५सुमारे इ.स. ३३
त्यांनी त्याला बाहेर घालविले, हे येशूंनी ऐकले आणि तो त्यांना भेटल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “तुझा मानवपुत्रावर विश्वास आहे का?”
- योहान ९:३६सुमारे इ.स. ३३
तो म्हणाला, “प्रभू, ते कोण हे मला सांगा म्हणजे मी त्यांच्यावर विश्वास ठेवेन.”
- योहान ९:३७सुमारे इ.स. ३३
येशू म्हणाले, “आता तू त्याला पाहिले आहेस आणि खरेतर तो तुझ्याशी बोलत आहे.”
- योहान ९:३८सुमारे इ.स. ३३
“होय प्रभूजी,” तो म्हणाला, “मी विश्वास धरतो!” आणि त्याने त्यांची उपासना केली.
- योहान ९:३९सुमारे इ.स. ३३
मग येशू म्हणाले, “मी न्याय करण्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की आंधळ्यांना दिसावे आणि जे पाहतात त्यांनी आंधळे व्हावे.”
- योहान ९:४०सुमारे इ.स. ३३
जे परूशी तिथे होते त्यांनी जे बोलले ते ऐकले आणि विचारले, “आम्ही आंधळे आहोत काय?”
- योहान ९:४१सुमारे इ.स. ३३
येशू म्हणाले, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्ही पापी नसता; परंतु तुम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”
- योहान १०:१सुमारे इ.स. ३३
“परूश्यांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो कोणी मेंढवाड्यात दारातून आत प्रवेश करत नाही आणि दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असला पाहिजे.
- योहान १०:२सुमारे इ.स. ३३
जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे.
- योहान १०:३सुमारे इ.स. ३३
दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्यांची वाणी ओळखतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो.
- योहान १०:४सुमारे इ.स. ३३
आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात.
- योहान १०:५सुमारे इ.स. ३३
ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत; उलट ती त्याच्यापासून दूर पळून जातील, कारण ती त्या परक्याची वाणी ओळखीत नाहीत.”
- योहान १०:६सुमारे इ.स. ३३
येशू हे अलंकारिकरित्या बोलले, परंतु परूश्यांना ते समजले नाही.
- योहान १०:७सुमारे इ.स. ३३
यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.
- योहान १०:८सुमारे इ.स. ३३
जे सर्व माझ्यापूर्वी आले होते ते सर्व चोर व लुटारू होते, मेंढरांनी त्यांचे ऐकले नाही.
- योहान १०:९सुमारे इ.स. ३३
मीच दार आहे; जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो त्याचे तारण होईल. ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना कुरणे आढळतील.
- योहान १०:१०सुमारे इ.स. ३३
चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यास येतो; मी त्यांना जीवन मिळावे व ते विपुलपणे मिळावे म्हणून आलो आहे.
- योहान १०:११सुमारे इ.स. ३३
“मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो.
- योहान १०:१२सुमारे इ.स. ३३
परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते.
- योहान १०:१३सुमारे इ.स. ३३
तो मनुष्य पळून जातो कारण तो भाडेकरू असतो आणि त्याला मेंढरांची काहीच काळजी नसते.