मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहान १०:३९सुमारे इ.स. ३३

    त्यांना अटक करण्याचा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या हातातून निसटून गेले.

  2. योहान १०:४०सुमारे इ.स. ३३

    मग येशू यार्देन नदीच्या पलीकडे जिथे योहान आरंभीच्या दिवसात बाप्तिस्मा करीत असे, त्या ठिकाणी जाऊन राहिले.

  3. योहान १०:४१सुमारे इ.स. ३३

    आणि त्यांच्याकडे अनेक लोक आले. ते आपसात म्हणू लागले, “योहानाने काही चिन्ह केले नाही, तरी येशूंबद्दल त्याने जे काही सांगितले ते सर्व खरे ठरले आहे.”

  4. योहान १०:४२सुमारे इ.स. ३३

    तेव्हा त्या ठिकाणी अनेक लोकांनी येशूंवर विश्वास ठेवला.

  5. योहान ११:१सुमारे इ.स. ३३

    आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्थाच्या बेथानी गावाचा होता.

  6. योहान ११:२सुमारे इ.स. ३३

    ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभूच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते.

  7. योहान ११:३सुमारे इ.स. ३३

    तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.”

  8. योहान ११:४सुमारे इ.स. ३३

    येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.”

  9. योहान ११:५सुमारे इ.स. ३३

    मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती,

  10. योहान ११:६सुमारे इ.स. ३३

    तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तिथेच अधिक दोन दिवस राहिले.

  11. योहान ११:७सुमारे इ.स. ३३

    यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “चला आपण परत यहूदीयात जाऊ.”

  12. योहान ११:८सुमारे इ.स. ३३

    परंतु शिष्य म्हणाले, “गुरुजी, थोड्याच दिवसांपूर्वी यहूदी आपल्याला धोंडमार करण्याचा प्रयत्न करीत होते आणि तरी आपण पुन्हा तिथे जाता काय?”

  13. योहान ११:९सुमारे इ.स. ३३

    येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते.

  14. योहान ११:१०सुमारे इ.स. ३३

    जेव्हा एखादी व्यक्ती रात्री चालते तेव्हा ती अडखळते, कारण तिच्याजवळ प्रकाश नसतो.”

  15. योहान ११:११सुमारे इ.स. ३३

    असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.”

  16. योहान ११:१२सुमारे इ.स. ३३

    त्यांचे शिष्य म्हणाले, “प्रभूजी तो झोपला असेल, तर बरा होईल.”

  17. योहान ११:१३सुमारे इ.स. ३३

    येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत.

  18. योहान ११:१४सुमारे इ.स. ३३

    मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले, “लाजर मरण पावला आहे,

  19. योहान ११:१५सुमारे इ.स. ३३

    तुमच्यासाठी मी तिथे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”

  20. योहान ११:१६सुमारे इ.स. ३३

    परंतु दिदुम म्हटलेला थोमा इतर शिष्यांना म्हणाला, “चला, आपणही त्यांच्याबरोबर मरू.”

  21. योहान ११:१७सुमारे इ.स. ३३

    ते तिथे पोहोचल्यावर, येशूंना समजले की, लाजराला कबरेत ठेऊन चार दिवस झाले होते.

  22. योहान ११:१८सुमारे इ.स. ३३

    बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा कमी अंतरावर होते.

  23. योहान ११:१९सुमारे इ.स. ३३

    आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.

  24. योहान ११:२०सुमारे इ.स. ३३

    येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली.

  25. योहान ११:२१सुमारे इ.स. ३३

    “प्रभूजी,” मार्था येशूंना म्हणाली, “आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता.