मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहान ९:५सुमारे इ.स. ३३

    मी या जगात आहे, तेव्हापर्यंत मी या जगाचा प्रकाश आहे.”

  2. योहान ९:६सुमारे इ.स. ३३

    असे बोलून, ते जमिनीवर थुंकले व थुंकीने चिखल करून त्याचा लेप त्यांनी त्या माणसाच्या डोळ्यांवर लावला.

  3. योहान ९:७सुमारे इ.स. ३३

    “जा, ते त्याला म्हणाले, शिलोआम तळ्यात डोळे धू.” (शिलोआम म्हणजे पाठविलेला.) तेव्हा तो मनुष्य गेला व त्याने डोळे धुतले आणि डोळस होऊन घरी गेला.

  4. योहान ९:८सुमारे इ.स. ३३

    त्याचे शेजारी आणि इतर लोक त्याला एक भिकारी म्हणून ओळखत होते, ते एकमेकांना विचारू लागले “बसून भीक मागणारा तो हाच मनुष्य नाही काय?”

  5. योहान ९:९सुमारे इ.स. ३३

    काहीजण म्हणाले, “होय, हाच तो.” पण इतर म्हणाले, “नाही, तो फक्त त्याच्यासारखा दिसतो.” तो भिकारी आग्रहपूर्वक म्हणाला, “मी तोच मनुष्य आहे!”

  6. योहान ९:१०सुमारे इ.स. ३३

    “मग तुझे डोळे कसे उघडले?” त्यांनी त्याला विचारले.

  7. योहान ९:११सुमारे इ.स. ३३

    तेव्हा त्याने सांगितले, “येशू नावाच्या एका मनुष्याने चिखल केला आणि माझ्या डोळ्यांवर लावला. मग मला शिलोआमाच्या तळ्यावर जाऊन चिखल धुण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी जाऊन धुतले व मला दृष्टी प्राप्त झाली.”

  8. योहान ९:१२सुमारे इ.स. ३३

    त्यांनी विचारले, “तो मनुष्य कुठे आहे?” तो म्हणाला, “मला माहीत नाही.”

  9. योहान ९:१३सुमारे इ.स. ३३

    तेव्हा त्यांनी जो मनुष्य आंधळा होता त्याला परूश्यांकडे आणले,

  10. योहान ९:१४सुमारे इ.स. ३३

    आता येशूंनी चिखल तयार करून त्या माणसाचे डोळे उघडले तो शब्बाथवार होता.

  11. योहान ९:१५सुमारे इ.स. ३३

    यास्तव परूश्यांनीही त्याला दृष्टी कशी आली हे विचारले. तेव्हा तो मनुष्य उत्तरला, “त्यांनी माझ्या डोळ्यांवर चिखल लावला आणि मी तो धुऊन टाकला आणि आता मी पाहू शकतो.”

  12. योहान ९:१६सुमारे इ.स. ३३

    त्यांच्यापैकी काही परूशी म्हणाले, “हा मनुष्य परमेश्वरापासून आलेला नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” परंतु इतरांनी विचारले, “पण पातकी मनुष्याला अशी चिन्हे करता येतील का?” यावरून त्यांच्यामध्ये फूट पडली.

  13. योहान ९:१७सुमारे इ.स. ३३

    शेवटी परूशी पुन्हा आंधळ्या मनुष्याकडे वळले व त्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्यांच्याविषयी तुला काय म्हणावयाचे आहे?” यावर तो मनुष्य उत्तरला, “तो परमेश्वराचा संदेष्टा आहे.”

  14. योहान ९:१८सुमारे इ.स. ३३

    यहूदी पुढार्‍यांनी दृष्टी प्राप्त झालेल्या त्या माणसाच्या आईवडिलांस बोलावून आणेपर्यंत, तो आंधळा होता आणि आता त्याला दिसते, यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.

  15. योहान ९:१९सुमारे इ.स. ३३

    त्यांना विचारले, “हा तुमचा मुलगा आहे काय? तुम्ही म्हणता तो हाच आहे का जो आंधळा जन्मला होता? तर मग त्याला आता दृष्टी कशी आली?”

  16. योहान ९:२०सुमारे इ.स. ३३

    तेव्हा त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला होता हे आम्हास ठाऊक आहे.

  17. योहान ९:२१सुमारे इ.स. ३३

    तरी त्याला आता कसे दिसते किंवा त्याला कोणी दृष्टी दिली, हे आम्हास माहीत नाही. तो प्रौढ आहे. त्यालाच विचारा.”

  18. योहान ९:२२सुमारे इ.स. ३३

    त्याचे आईवडील यहूदी पुढार्‍यांच्या भीतीमुळे असे म्हणाले, कारण त्यांनी आधी ठरविले होते की जे कोणी, येशू हा ख्रिस्त आहे, असे कबूल करतील, त्यांना सभागृहामधून बाहेर टाकण्यात यावे.

  19. योहान ९:२३सुमारे इ.स. ३३

    यामुळे त्याच्या आईवडिलांनी म्हटले, “तो प्रौढ आहे; त्याला विचारा.”

  20. योहान ९:२४सुमारे इ.स. ३३

    तेव्हा जो मनुष्य पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी पुन्हा दुसर्‍यांदा बोलावून सांगितले, “सत्य सांगून परमेश्वराचे गौरव कर, हा मनुष्य पापी आहे, हे आम्हाला माहीत आहे.”

  21. योहान ९:२५सुमारे इ.स. ३३

    त्यावर तो म्हणाला, “तो पापी आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. परंतु मला एक गोष्ट माहीत आहे. मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते!”

  22. योहान ९:२६सुमारे इ.स. ३३

    त्यांनी त्याला विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”

  23. योहान ९:२७सुमारे इ.स. ३३

    तेव्हा त्याने उत्तर दिले, “मी या आधीच तुम्हाला सांगितले; पण तुम्ही ऐकले नाही. ते पुन्हा का ऐकता? त्यांचे शिष्य व्हावे अशी तुमची इच्छा आहे काय?”

  24. योहान ९:२८सुमारे इ.स. ३३

    त्यावर त्यांनी त्याची निंदा केली व ते म्हणाले, “तूच त्याचा शिष्य आहेस! आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत!

  25. योहान ९:२९सुमारे इ.स. ३३

    आम्हाला माहीत आहे की परमेश्वर मोशेशी बोलले, परंतु याच्याबद्दल म्हणशील, तर तो कुठला आहे हे आम्हास ठाऊक देखील नाही.”