मुख्य मजकुरावर जा

Gibeah

41 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Gibeath

31.8200, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Gibeah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा निरोप्यांनी शौलाच्या गिबियाह येथे जाऊन तेथील लोकांस हे वर्तमान दिले, तेव्हा त्या सर्वांनी मोठ्याने आकांत केला.

  2. शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले.

  3. नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती.

  4. शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते.

  5. इकडे बिन्यामीनच्या गिबियाहतील शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले की सैन्य विखरून सर्व दिशेने धावत जात आहे.

  6. नंतर शमुवेल रामाह येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिबियाहकडे परतला.

  7. आता शौलाने ऐकले की, दावीद आणि त्याच्या माणसांचा शोध लागला आहे. तेव्हा शौल हातात भाला घेऊन, गिबियाह येथील टेकडीवर चिंचेच्या झाडाखाली बसला, त्याचे सर्व अधिकारी त्याच्या सभोवती उभे राहिले.

  8. जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “होरेशच्या गडांमध्ये, हकीलाहच्या डोंगरात, यशीमोनच्या दक्षिणेकडे दावीद आमच्यामध्ये लपून राहत नाही काय?

  9. जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “जेशीमोनच्या समोर असलेल्या हकीलाहच्या डोंगरावर दावीद लपून राहत नाही काय?”

  10. तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना तुमच्या हाती देईन.”

  11. नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेब, गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तई,

  12. गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तय, पिराथोनचा बेनाइयाह,

  13. ते पुढे पलीकडे जातात आणि म्हणतात, “आम्ही गेबा येथे रात्रभर छावणी टाकू.” रामाह थरथर कापतो; शौलाचा गिबियाह पळून जातो.

  14. “तुम्ही गिबियाहात शिंग फुंका, रामाह येथे कर्णा वाजवा. बेथ-आवेन येथे उंच आवाजात युद्धाची घोषणा करा; बिन्यामीन आमचे नेतृत्व करा.

  15. जसे गिबियाहमधील दिवसात केले तसे त्यांनी स्वतःला अधिक भ्रष्ट केले आहे. परमेश्वर त्यांचे दुष्कर्म स्मरणात ठेवतील आणि त्यांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करतील.

  16. “हे इस्राएला, गिबियाहतील दिवसापासून तू पाप करीत आला आहेस आणि तू तिथेच राहिला. गिबियाहच्या दुष्कृत्य करणाऱ्या विरुद्ध पुन्हा युद्ध भडकणार नाही काय?