मुख्य मजकुरावर जा

Samuel

122 वचने · 4 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Shemuel

Samuel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शेवटी, शौल स्वतः रामाहास निघाला व सेखू येथील मोठ्या विहिरीपर्यंत पोहोचल्यावर, त्याने विचारले, “दावीद व शमुवेल कुठे आहेत?” ते म्हणाले, “रामाहतील नायोथ येथे ते गेले आहेत.”

  2. त्याने आपली वस्त्रे काढली आणि शमुवेलपुढे भविष्यवाणी करू लागला. तो संपूर्ण दिवस व ती रात्र शौल विवस्त्र पडून राहिला. त्यावरूनच लोक म्हणतात, “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?”

  3. शमुवेल मरण पावला, तेव्हा सर्व इस्राएली लोक एकत्र जमले आणि त्याच्यासाठी शोक केला; आणि त्यांनी त्याला रामाह येथील त्याच्या घरी पुरले. नंतर दावीद खाली पारानच्या वाळवंटात गेला.

  4. शमुवेल तर मरण पावला होता आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्यासाठी शोक केला होता आणि त्याला त्याच्याच रामाह नगरात पुरले होते. शौलाने मृतात्म्यांशी संपर्क साधणारे आणि तंत्रमंत्र करणारे यांना देशातून घालवून दिले होते.

  5. तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला वर आणू?” तो म्हणाला, “शमुवेलला वर आण.”

  6. जेव्हा त्या स्त्रीने शमुवेलला पाहिले, तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि शौलाला म्हणाली, “तुम्ही मला का फसविले आहे? तुम्ही शौल आहात!”

  7. “तो कसा दिसतो?” त्याने विचारले. “झगा घातलेला एक वृद्ध पुरुष वर येत आहे,” ती म्हणाली. तेव्हा शौलाने ओळखले की तो शमुवेल होता आणि त्याने स्वतः त्याचे तोंड खाली जमिनीकडे करून दंडवत घातले.

  8. शमुवेल शौलास म्हणाला, “मला वर आणून तू मला का त्रास दिला आहेस?” शौलाने उत्तर दिले, “मी फार मोठ्या संकटात आहे, पलिष्टी माझ्याविरुद्ध लढाई करत आहेत आणि परमेश्वराने मला सोडून दिले आहे. परमेश्वर मला संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नां द्वारे उत्तर देत नाही. यामुळेच मी काय करावे हे तुम्ही मला सांगावे म्हणून मी तुम्हाला बोलाविले आहे.”

  9. शमुवेल म्हणाला, “याहवेहने तुला सोडले आहे आणि ते तुझे शत्रू झाले आहेत, तर तू माझा सल्ला का घ्यावा?

  10. शौल लगेच तसाच जमिनीवर पडला, शमुवेलने सांगितलेल्या शब्दांमुळे तो फार भयभीत झाला. त्याच्यात काही शक्ती राहिली नाही, कारण त्याने दिवसभर आणि रात्रभर काहीही खाल्ले नव्हते.

  11. शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह.

  12. ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र,

  13. द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते.

  14. जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते.

  15. शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)

  16. दावीद राजाच्या कारकिर्दीतील घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रष्टा शमुवेल, संदेष्टा नाथान आणि द्रष्टा गाद यांच्या ग्रंथात लिहिल्या आहेत.

  17. शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता.

  18. मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते, व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्‍यांपैकी होते; यांनी याहवेहचा धावा केला, आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.

  19. तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे!

  20. “खरोखरच, शमुवेल संदेष्ट्याने आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक संदेष्ट्याने आजच्या या दिवसाबद्दल भविष्य सांगितलेले आहे.

  21. हे सर्व घडून येण्यास सुमारे चारशे पन्नास वर्षे लागली. “त्यानंतर, परमेश्वराने त्यांना शमुवेल संदेष्टा येईपर्यंत न्यायाधीश नेमून दिले.

  22. तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावी? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्ट्यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही.