मुख्य मजकुरावर जा

Noah

47 वचने · 4 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Noe

Noah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग परमेश्वर नोआहला व त्याच्या पुत्रांना म्हणाले:

  2. परमेश्वर नोआहस म्हणाले, “पृथ्वीवरील सर्व सजीव व माझ्याबरोबर स्थापित झालेल्या कराराचे हे चिन्ह असेल.”

  3. नोआहबरोबर तारूमधून बाहेर आलेल्या पुत्रांची नावे शेम, हाम व याफेथ ही होती. (हाम हा कनानाचा पिता होता.)

  4. हे नोआहचे तीन पुत्र होते आणि यांच्याद्वारे पृथ्वीवर मानवजात पसरली.

  5. नोआह शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला.

  6. नोआह नशेतून शुद्धीवर आला आणि आपला धाकट्या पुत्राने काय केले हे त्याला समजले,

  7. जलप्रलयानंतर नोआह साडेतीनशे वर्षे जगला.

  8. 950 वर्षाचा होऊन नोआह मृत्यू पावला.

  9. नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले.

  10. वर दिलेल्या यादीत नमूद केलेले सर्व लोक नोआहच्या अनेक पिढ्यांतील गोत्र होते. त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रांत वस्ती केली. ही सर्व राष्ट्रे जलप्रलयानंतर पसरली.

  11. नोआहाचे पुत्र: शेम, हाम व याफेथ.

  12. “हे माझ्याकरिता नोआहच्या दिवसासारखे आहे, मी पृथ्वी पुन्हा नोआहच्या जलाने आच्छादित करणार नाही, अशी मी शपथ वाहिली होती. आता ही शपथ वाहतो, यापुढे तुझ्यावर क्रोधित होणार नाही, तुला पुन्हा कधीही रागविणार नाही.

  13. जरी नोआह, दानीएल व इय्योब हे तिघे त्या देशात असते; तरी त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ तेच वाचले असते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  14. तर सार्वभौम याहवेह जाहीर करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी नोआह, दानीएल व इय्योब त्यात असते, ते आपल्या मुलांना किंवा मुलींना वाचवू शकले नसते. त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ ते आपलाच जीव वाचवू शकले असते.

  15. जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल.

  16. जलप्रलय येण्यापूर्वी, नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते.

  17. तो केनानाचा पुत्र, तो अर्पक्षदाचा पुत्र, तो शेमाचा पुत्र, तो नोआहचा पुत्र, तो लामेखाचा पुत्र,

  18. “जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या दिवसात होईल.

  19. नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. नंतर जलप्रलय आला व त्या सर्वांचा नाश झाला.

  20. विश्वासाद्वारे नोआहने कोणी कधीही पाहिले नाही अशा गोष्टीबद्दल परमेश्वराने दिलेला इशारा ऐकला आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आदरयुक्त भीतीने तारू बांधले. नोआहने विश्वासामुळेच जगाचा धिक्कार केला आणि त्याला नीतिमत्वाचे वतन प्राप्त झाले.

  21. ज्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नव्हते; पूर्वी नोआहच्या काळामध्ये जहाज बांधले जात असताना परमेश्वराने धीराने त्यांची वाट पाहिली. त्यामध्ये असलेले फक्त थोडे लोक, सर्व मिळून आठजण पाण्यामधून वाचले होते.

  22. त्यांनी प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्त्वाचा संदेश देणारा नोआहचे सात जणांसह रक्षण केले.