मुख्य मजकुरावर जा

Moab

151 वचने · 5 कुटुंब सदस्य

Moab चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या दिवशी मोआबी लोक इस्राएली लोकांच्या अधीन आले आणि त्यानंतर देशाला ऐंशी वर्षे शांतता लाभली.

  2. इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले.

  3. म्हणाला: “इफ्ताह असे म्हणतो: इस्राएलने मोआब किंवा अम्मोनी लोकांची भूमी घेतली नाही.

  4. तेव्हा इस्राएली लोकांनी एदोमाच्या राजाकडे दूतांना पाठवून म्हटले, ‘आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या,’ परंतु एदोमाच्या राजाने ऐकले नाही. तसाच त्यांनी मोआबाच्या राजाकडे निरोप पाठविला आणि त्यानेही नकार दिला. म्हणून इस्राएली लोक कादेश येथेच राहिले.

  5. “नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती.

  6. सिप्पोरचा पुत्र मोआबाचा राजा बालाकहून आपण श्रेष्ठ आहोत, असे तुला वाटते काय? त्याने इस्राएलशी कधी भांडण केले का किंवा त्यांच्याशी त्याने युद्ध केले काय?

  7. त्या दिवसांमध्ये जेव्हा शास्ते शासन करीत होते तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडला. म्हणून एक मनुष्य यहूदीयाच्या बेथलेहेम येथून त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासह थोड्या काळासाठी मोआब देशात राहवयास गेला.

  8. त्या मनुष्याचे नाव एलीमेलेख, त्याच्या पत्नीचे नाव नाओमी आणि त्याच्या दोन मुलांची नावे महलोन आणि किलिओन. ते यहूदीयाच्या बेथलेहेम येथील एफ्राथी वंशाचे होते. ते मोआब देशात गेले आणि तिथेच राहिले.

  9. त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर,

  10. जेव्हा नाओमीने मोआब येथे ऐकले की, याहवेह त्यांच्या लोकांच्या मदतीला आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी अन्नाचा पुरवठा केला आहे, तेव्हा तिने आणि तिच्या सुनांनी त्यांच्या घराकडे परत जाण्याची तयारी केली.

  11. अशाप्रकारे नाओमी, तिची मोआबी सून रूथबरोबर मोआब देशातून परत आली, त्या दोघी बेथलेहेमात पोहोचल्या, त्यावेळी सातूचा हंगाम सुरू झाला होता.

  12. त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे.

  13. तेव्हा तो जबाबदारी घेऊन सोडवणूक करणाऱ्या मनुष्यास म्हणाला, “नाओमी मोआब देशातून परत आली आहे. ती आता ज्या जमिनीचा भाग विकत आहे, ती आपला नातेवाईक एलीमेलेखच्या मालकीची आहे.

  14. “परंतु याहवेह त्यांच्या परमेश्वरांना ते विसरले; म्हणून याहवेहने त्यांना हासोरचा सेनापती सिसेराच्या हाती आणि पलिष्ट्यांच्या हाती आणि मोआबच्या राजाच्या हाती विकून टाकले आणि ते त्यांच्याशी लढले.

  15. इस्राएलवर आपले राज्य स्थापित केल्यावर, चहूकडील असलेले त्यांचे शत्रू: मोआब, अम्मोनी, एदोम, सोबाहचे राजे व पलिष्टी यांच्याशी शौल लढला. जिथे कुठे तो जाई, तिथे तो विजयी होई.

  16. तिथून निघून दावीद मोआबातील मिस्पाह येथे गेला आणि मोआबच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझ्यासाठी काय करेल, हे मला समजेपर्यंत माझ्या आईवडिलांना तुमच्याजवळ राहू द्याल काय?”

  17. तेव्हा त्याने त्यांना मोआबच्या राजाकडे सोडले आणि जोपर्यंत दावीद गडांमध्ये होता तोपर्यंत ते राजाकडे राहिले.

  18. दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला. त्याने त्यांना जमिनीवर झोपविले आणि दोरीच्या अंतराने त्यांचे मोजमाप केले. जे दोन दोर्‍या भरले त्यांना मारून टाकले आणि जे एक दोरी भरले त्यांना जिवंत सोडले. याप्रकारे मोआबी लोक दावीदाच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.

  19. अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.

  20. कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.

  21. शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली.

  22. अहाब राजा मरण पावल्यानंतर मोआबाने इस्राएलविरुद्ध बंड केले.

  23. मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता आणि तो इस्राएली राजास कर म्हणून दरवर्षी एक लाख मेंढरे आणि एक लाख मेंढ्याची लोकर देत असे.

  24. परंतु अहाबाच्या मृत्यूनंतर मोआबाच्या राजाने इस्राएलविरुद्ध बंड पुकारले.

  25. यहूदीयाचा राजा यहोशाफाटला हा निरोप पाठविला: “मोआबाच्या राजाने माझ्याविरुद्ध बंड पुकारले आहे. तेव्हा त्याच्याविरुद्ध लढण्यास माझ्यासोबत येशील काय?” यहोशाफाटने उत्तर दिले, “मी तुझ्यासोबत येईन. जसा तू तसा मी, जे माझे लोक ते तुझे लोक, जे माझे घोडे ते तुझे घोडे.”