मुख्य मजकुरावर जा

Moab

151 वचने · 5 कुटुंब सदस्य

Moab चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. घरट्यातून ढकलून दिलेल्या फडफडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, मोआबच्या स्त्रिया आर्णोनच्या घाटावर आहेत.

  2. पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या; संहारकापासून त्यांचा आश्रय व्हा.” जुलूम करणाऱ्याचा शेवट होईल, आणि नाश थांबेल; आक्रमण करणारे नाहीसे होतील.

  3. मोआबाच्या अभिमानाबद्दल आम्ही ऐकले आहे— तिचा अहंकार किती मोठा आहे! तिची घमेंड, तिचा अभिमान आणि तिचा उर्मटपणा; परंतु तिच्या सर्व फुशारक्या पोकळ आहेत.

  4. म्हणून मोआबी मोठ्याने रडतात, मोआबसाठी ते एकत्र मोठ्याने रडतात. कीर-हरेसेथचा बेदाणा किंवा मनुका मिश्रित पिठाच्या गोड ढेपांसाठी विलाप आणि शोक करतात.

  5. माझे हृदय वीणेप्रमाणे मोआबसाठी विलाप करीत आहे, कीर-हरेसेथसाठी माझे अंतःकरण विलाप करीत आहे.

  6. जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते, तेव्हा ती फक्त स्वतःला थकविते; जेव्हा ती तिच्या दैवतांची प्रार्थना करावयाला जाते, तेव्हा त्याचा काही उपयोग होत नाही.

  7. याहवेह यांनी मोआबविरुद्ध आधीच हे वचन सांगितले आहे.

  8. परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”

  9. याहवेहचा हात या पर्वतावर राहील; परंतु जसे कडबा खतामध्ये तुडविला जातो, तसे मोआबी त्यांच्या भूमीत तुडविले जातील.

  10. म्हणजे इजिप्ती, एदोमी, अम्मोनी, मोआबी, अरबी, आणि होय, तुम्ही यहूदीयातील लोकांना आणि ते सर्व जे वाळवंटातील दूरच्या प्रदेशात राहतात. या सर्व राष्ट्रांची सुंता झाली नाही, परंतु इस्राएलच्या हट्टी अंतःकरणाची सुंता झालेली नाही.”

  11. एदोम, मोआब व अम्मोन;

  12. मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,

  13. यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा

  14. मोआबी लोकांविषयी: इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, यांनी दिलेला संदेश हा आहे: “नबो शहराचा धिक्कार असो, कारण त्याचा विध्वंस होईल. किर्याथाईम लज्जित होईल व हस्तगत करण्यात येईल; तेथील किल्ले लज्जित होतील व चक्काचूर करण्यात येतील.

  15. आता यापुढे मोआबाची कोणीही प्रंशसा करणार नाही; हेशबोनमधील लोक तिच्या अधःपतनाचा कट रचतील: ते म्हणतील, ‘चला, आपण त्या राष्ट्राचा अंत करू.’ तुम्ही मदमेनमधील लोकही निःशब्द केले जातील; तलवार तुमचा पाठलाग करेल.

  16. कारण मोआब भूमीचा भंग केला जाणार आहे, तिचे बालक विलाप करतील.

  17. मोआबावर मीठ टाका कारण तिचा उकिरडा बनेल; तिची नगरे उजाड़ होतील, तिथे कोणीही वसती करणार नाही.

  18. “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— ती बंदिवासात गेलेली नाही. म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, आणि तिचा सुवासही बदललेला नाही.

  19. इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल,

  20. परंतु आता मोआबचा सर्वनाश होणार आहे, तिची नगरे हस्तगत केली जाणार आहेत; तिच्या अत्यंत उमद्या तरुणांची कत्तल होईल,” असे राजाधिराज, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे ते म्हणतात.

  21. “मोआबचा पाडाव अगदी जवळ आलेला आहे; तिच्यावरील अरिष्ट वेगाने येणार आहे.

  22. “अहो दिबोन कन्येचे निवासी, आपल्या वैभवावरून खाली उतरा आणि शुष्क भूमीवर येऊन बसा, कारण जे मोआब भूमीचा विनाशक तुमच्याविरुद्ध येत आहेत आणि ते तिच्या सर्व तटबंदीची नगरे नष्ट करतील.

  23. मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे. रडा व आकांत करा! आर्णोनच्या काठी घोषणा करा मोआब नष्ट झाले आहे.

  24. करीयोथ, बस्रा— मोआबभूमीच्या जवळच्या व दूरच्या सर्वच नगरांना शिक्षा झाली आहे.

  25. मोआबभूमीचे शिंग तोडून टाकण्यात आले आहे. तिचे बाहू मोडले आहेत.” असे याहवेह जाहीर करतात.